
Emotional Viral Video from Baramati Medical College: महाराष्ट्राच्या राजकारणावर खोलवर ठसा उमटवणारे, धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. आज, 29 जानेवारी रोजी, त्यांच्या कर्मभूमी असलेल्या बारामतीत त्यांना अखेरचा निरोप दिला गेला. लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देताना आज बारामतीचं काळीज फाटलं. त्या आधी शासकीय रुग्णालयाबाहेरही कार्यकर्ते, जनता आणि चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी पार्थ पवार व्यवस्था पाहत होते. त्याचवेळी एका कार्यकर्त्याने धाय मोकलून रडत “पार्थ दादा, दादाला ‘I Love You’ सांग…” अशी भावनिक साद घातली. हा काळजाला भिडणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेम पाहून पार्थही क्षणभर सुन्न झाले.
नक्की काय झालं?
अजितदादांचे पार्थिव बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याच ठिकाणाहून एक अत्यंत हृदयद्रावक आणि भावनिक व्हिडीओ समोर आला असून, तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार रुग्णालय परिसरात उभे राहून व्यवस्थेची पाहणी करताना दिसत आहेत. त्याचवेळी, अजितदादांचा एक निष्ठावान कार्यकर्ता भावनांना आवर न घालू शकता, अक्षरशः धाय मोकलून रडताना दिसतो. डोळ्यांतून अश्रू वाहत असताना, तो पार्थ पवारांकडे पाहून आर्त स्वरात म्हणतो, “दादाला ‘I Love You’ सांग… पार्थ दादा, दादाला ‘I Love You’ म्हण.”
हा क्षण इतका भावूक होता की, आजूबाजूला उपस्थित असलेल्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. आपल्या वडिलांवर जनतेचे असलेले अपार प्रेम आणि जिव्हाळा पाहून पार्थ पवार काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. त्यांनी शांतपणे हात उंचावून त्या कार्यकर्त्याला प्रतिसाद दिला, जणू काही शब्दांशिवायच त्याच्या भावनांचा स्वीकार केला.
यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयाचे गेट बंद करण्यात आले. मात्र, तो काही सेकंदांचा प्रसंग अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वावर जनतेचे असलेले निस्सीम प्रेम, विश्वास आणि आपुलकी स्पष्टपणे दाखवून गेला.
#WATCH | Baramati | Parth Pawar, son of Maharashtra Deputy CM late Ajit Pawar, at the Punyashlok Ahilyadevi Holkar Government Medical College ahead of last rites to be held today pic.twitter.com/fxvHzGy9MN
— ANI (@ANI) January 29, 2026
व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, “नेता म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणून अजितदादांनी लोकांच्या मनात घर केलं होतं” याचीच प्रचिती तो देतो आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



