digital products downloads

लिनेस क्लब ठरतेय समाजातील अंतिम घटकाच्या सेवेचे माध्यम: नूतन प्रांताध्यक्ष कल्पना देशमुख यांचे प्रतिपादन, ‘लिनेस’चा सोहळा‎ – Akola News

लिनेस क्लब ठरतेय समाजातील अंतिम घटकाच्या सेवेचे माध्यम:  नूतन प्रांताध्यक्ष कल्पना देशमुख यांचे प्रतिपादन, ‘लिनेस’चा सोहळा‎ – Akola News


महिला सशक्तिकरण, आरोग्य परीक्षण, शिक्षण, पर्यावरण, सामुदायिक सेवा हे पाच सूत्री सेवा यावर भर देत लिनेस क्लब केवळ संघटन नसून सेवा व संवेदनशीलतेच्या माध्यमातून समाजातील अंतिम घटकाच्या सेवेचे माध्यम ठरत आहे, असे प्रतिपादन लिनेस क्लबच्या नूतन प्रांताध्यक

.

या सोहळ्यात नूतन प्रांताध्यक्ष म्हणून कल्पना देशमुख, सचिव रिंकू खंडेलवाल, कोषाध्यक्ष शीतल अग्रवाल यांनी पदभार ग्रहण केले. यावेळी डिस्ट्रिक्टमधील रिजन एकच्या ममता सूर्या, रिजन दोनच्या सुनंदा कुलकर्णी, रिजन तीनच्या डॉ. राखी अग्रवाल, कॅबिनेट ऑफिसर व सर्व पदाधिकाऱ्यांना शपथ प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन, गणेश वंदना, संस्कृती समूहाच्या नृत्य सादरीकरणाने करण्यात आला. ध्वजवंदना रत्नमाला रुईकर यांनी, स्वागतगीत रचना खंडेलवाल यांनी तर लिनेस प्रार्थना आशा पटेल यांनी सादर केली. यावेळी ऋतुजा ग्रुपने स्वागत नृत्य सादर केले. शपथविधी अधिकाऱ्यांचा परिचय सुनंदा गुप्ता यांनी, इंदू मेहता यांचा परिचय स्वाती झुनझुनवाला यांनी केला. सोहळ्यात किट वितरण व कॅबिनेट सेवा कार्य उमा बाजोरीया, सुलेखा गुप्ता, प्रेमा मुंदडा यांनी सांभाळले. तर हळदीकुंकू वाण सेवा राजश्री समनपुरे, अलका उमाळे, इंद्रायणी देशमुख, नीता अग्रवाल यांनी सांभाळले. यावेळी पीएसटी प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आला.

सोहळ्याच्या यशस्वितेसाठी उमा बाजोरीया, सुलेखा गुप्ता, क्लब अध्यक्ष राजश्री समनपुरे, अलका उमाळे, इंद्रायणी देशमुख, रत्नमाला रुईकर, शीतल अग्रवाल, रिंकू खंडेलवाल, प्रेमा मुंदडा आदींनी परिश्रम घेतले. या लिनेस प्रांतीय पदग्रहण सोहळ्यात परभणी, शिरपूर, अकोला, खामगाव, अंबेजोगाई, नंदुरबार, भुसावळ, अमळनेर, मंगरूळपीर, मानोरा येथील लिनेसच्या माजी अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कॅबिनेट ऑफिसर समवेत बहुसंख्य लिनेस महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले.

महिलांसाठी विविध स्पर्धा या सोहळ्यात पदग्रहण समवेत कॅबिनेट मीटिंग, पीएसटी सेमिनार व अनेक स्पर्धा झाल्या. तसेच नियमावली सार्थक, लिनेस डिरेक्टरी संकल्पना तथा लिनेस पिन यांचे विमोचन करण्यात आले. डिरेक्टरी एडिटर अनिता उपाध्याय, अरू‌धती शिरसाट उपस्थित होत्या. यावेळी घेण्यात आलेल्या तीळ साहित्य स्पर्धेत ज्योती चरखा (वाशीम), नम्रता अग्रवाल (अकोला), सुलेखा पावली (परभणी) या विजेत्या ठरल्या. तर पतंग डेकोरेशन स्पर्धेत श्रद्धा जोशी, प्रेमा मुंदडा, ममता राठी विजेत्या घोषित करण्यात आल्या. तोरण बनवा स्पर्धेत श्रद्धा जोशी, नम्रता अग्रवाल, सुनिता शर्मा, निशा चांडक विजेत्या ठरल्या.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp