
Sunetra Pawar Will take Oath as DCM tomorrow: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. उद्या म्हणजेच शनिवारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रुपात महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत.
दरम्यान त्याआधी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक पार पडेल. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडेल.
‘मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार निर्णय’
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “उद्या दुपारी 2 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. सुनेत्रा पवारांशी आम्ही रात्री संवाद साधणार आहोत. पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद सदस्य आणि खासदार उपस्थित राहतील. जो निर्णय घेऊ त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कळवण्यात येईल. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे”.
उद्या 5 वाजता सुनेत्रा पवार घेणार शपथ
उद्या म्हणजेच शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. यानंतर पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे.
ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी कोणतीही जय्यत तयारी केली जाणार नसून, अत्यंत साधेपणाने तो पार पडेल. या शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल.
छगन भुजबळांनीही दिली होती शपथविधीची कल्पना
“दादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले त्यामुळे सर्वांची झोप उडाल्यासारखं झालं आहे. आता कोणाकडे तरी सर्व जबाबदारी देऊन पक्ष किंवा सरकार चालवावं तर लागणार आहे. विधीमंडळाच्या सदस्यांची उद्या बैठक बोलावली आहे. त्याच्यात विधिमंडळ पक्षनेतेपद जे अजित पवारांकडे होतं ते देण्यासंदर्भात निर्णय होईल. सुनेत्राताईंकडे पद द्यावं अशी अनेकांची मागणी आहे आणि ते चूक आहे असं वाटत नाही. पण निर्णय बैठकीत होईल,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
अजित पवार राष्ट्रवादीसंदर्भातील कामांवर आम्ही लक्ष देत आहोत सांगताना त्यांनी आपल्याला 14 बैठका झाल्याची काही कल्पना नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी आहे ती, सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून कशी भरता येईल याकडे लक्ष आहे. पक्ष ठरवेल त्याप्रमाणे निर्णय होईल. उद्या विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल आणि कदाचित एकमत झालं आणि प्रक्रिया झाली तर उद्याच शपथविधीही होऊ शकतो”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



