digital products downloads

‘दादा मला…’; अजित पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या महेश लांडगेंनी शोकसभेत हात जोडले अन्…

‘दादा मला…’; अजित पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या महेश लांडगेंनी शोकसभेत हात जोडले अन्…

Ajit Pawar Death In Plane Crash Mahesh Landge Video: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या निधानाने महाराष्ट्राने एक कर्तृत्वान आणि तळागाळाशी जोडलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. 29 जानेवारी रोजी बारामतीमध्ये लाखो समर्थकांबरोबरच अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यात आला.

Add Zee News as a Preferred Source

महेश लांडगे चर्चेत

अजित पवारांच्या मृत्यूनंतर सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार ठरत आहे ते भाजपाचे महेश लांडगे! काही आठवड्यांपूर्वीच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकींदरम्यान लांडगेनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. अजित पवारांच्या निधनानंतर महेश लांडगे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. महेश लांडगेंनी अजित पवारांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन खेद व्यक्त केला. तसेच त्यांनी अजित सृष्टी उभारण्याची घोषणाही केली. महेश लांडगेंनी केलेल्या टीकेवरुन काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पत्रकार परिषदेत ‘तो मोठा नेता आहे. तो अजित पवारला फालतू समजतो’ असं म्हणत खोचक टोला लगावला होता. मात्र आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेमध्ये महेश लांडगेही उपस्थित होते. त्यांनी अवघ्या 40 सेंकंदांमध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करुन मंच सोडल्याचं पाहायला मिळालं.

मंचावर आल्यावर काय बोलले लांडगे?

अजित पवारांचा आरे, तुरे असा उल्लेख करुन टीका करणाऱ्या महेश लांडगेंनी मंचावर आल्यानंतर मंचाच्या मध्यभागी ठेवलेल्या अजित पवारांच्या फोटोसमोर फुलं वाहिली. त्यानंतर मंचावरील पोडियमजवळ पोहोचले. माईक सरळ केला आणि ‘उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जड अंतकरणाने आलेला आहे. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं. माझ्या स्वत:ला लांडगे परिवाराच्यावतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो,’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या फोटोकडे पाहिलं आणि हात जोडून, “दादा मला माफ करा,” असं मान खाली घालत म्हटलं आणि पुढे काहीही न बोलता मंच सोडला.

प्रत्येकाच्या आठणींतील दादा ऐकून…

महेश लांडगेंनी सोशल मीडियावर या शोकसभेतील एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ते अजित पवारांच्या फोटोसमोर फुलं वाहताना दिसत आहेत. “महाराष्ट्राचे लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आली. प्रत्येकाने आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाच्या आठणींतील दादा ऐकून मन भरुन आले,” अशी कॅप्शन फोटोला दिली आहे.

महेश लांडगेंनी केलेल्या या दोन्ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp