digital products downloads

Om Raje Nimabalkar: अजितदादांच्या निधनानंतर ओम राजेनिंबाळकरांचा महत्त्वाचा निर्णय; झेडपी निवडणुकीबद्दल म्हणाले…

Om Raje Nimabalkar: अजितदादांच्या निधनानंतर ओम राजेनिंबाळकरांचा महत्त्वाचा निर्णय; झेडपी निवडणुकीबद्दल म्हणाले…

Om Raje Nimabalkar Important decision after Ajit Pawar Death: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या अपघाती निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. अजूनही अनेकांना ही घटना खरी वाटतं नाहीये. या दुःखद घटनेची तीव्रता राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणवत असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रचारासंदर्भात एक संवेदनशील आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाची शिवसेना आणि मित्रपक्षांच्या वतीने निवडणूक लढवली जात असून या संपूर्ण प्रक्रियेचे नेतृत्व ओम राजेनिंबाळकर करत आहेत. राज्यावर शोककळा असताना प्रचार करताना संयम आणि सामाजिक भान जपले जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Add Zee News as a Preferred Source

कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश

या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये राजेनिंबाळकर म्हणतात की, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याने एक अनुभवी आणि विकासाभिमुख नेता गमावला आहे. या दुःखद वातावरणात प्रचार करताना कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा टाळावा. हार-तुरे, सत्कार, वाजंत्री, बँड, हलगी किंवा फटाक्यांचा वापर न करता साध्या आणि सन्मानपूर्वक पद्धतीने प्रचार करावा, अशी त्यांनी विनंती केली आहे.

हे ही वाचा: Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी? अवघ्या 24 तासांत राजकीय समीकरणे बदलली

 

अजित पवार यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी आणि राज्याचं झालेलं अपूरणीय नुकसान लक्षात घेऊनच ही निवडणूक लढवावी, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. प्रचार करताना संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी जपण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

हे ही वाचा: “दादाला ‘I Love You’ सांग…” कार्यकर्त्याची पार्थ पवारांना भावनिक विनंती, VIDEO बघून काळजाचं पाणी होईल

 

नेमकी पोस्ट काय?

सविनय आवाहन

महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव आग्रही असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या धक्कादायक निधनाने धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

याच दुःखद परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराच्या अनुषंगाने माझे सर्व सहकारी, मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व उमेदवार यांना सविनय विनंती आहे की प्रचार करताना कोणत्याही प्रकारचे हार, तुरे, सत्कार, वाजंत्री, बँड, हलगी, फटाके टाळून, निवडणुकीची प्रचार यंत्रणा साध्या पद्धतीने राबवावी

अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या न भरून निघणाऱ्या नुकसानीचे भान व जाण ठेवूनच ही निवडणूक लढवावी, ही नम्र विनंती.

 

हे ही वाचा: Ajit Pawar Death: सुप्रिया सुळे यांनी स्टेटसला ठेवला ‘त्या’ दरवाजाचा Photo , ब्रोकन हार्ट इमोजीसहीत एका शब्दाची कॅप्शन

 

दरम्यान, 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या आणखी चार जणांचाही मृत्यू झाला. सध्या या अपघाताचा सखोल तपास सुरु आहे. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले असून नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून तपास सुरू आहे. त्याचबरोबर राज्य शासनानेही सीआयडीमार्फत स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp