digital products downloads

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली जाहीर प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली जाहीर प्रतिक्रिया

Sunetra Pawar DCM Of Maharashtra : 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राष्ट्रवादीची सूत्र हाती घेतली आहेत. अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता, मात्र, आज त्यावर पडदा पडला असून सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार आहेत. आज लोकभवनात सूनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 3 दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्रीपद स्विकारावे अशी चर्चा झाल्यापासून सुनेत्रा पवार यांनी कोणहीती प्रतिक्रिया दिलेली नव्हती. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले आहेत. 

सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट

“आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.” अस त्यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे. 

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या  सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 
आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यामुळे अधिक बळकट झाला आहे. आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद… असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. 

या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल असेही सुनेत्रा अजितदादा पवार यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहिन तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू असा शब्दही सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, असा संकल्प सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp