digital products downloads

‘दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी पार्थ पवार गोविंद बागेत…’, अजित पवारांना राजकारणात आणणाऱ्या व्यक्तीने सांगितली INSIDE STORY

‘दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी पार्थ पवार गोविंद बागेत…’, अजित पवारांना राजकारणात आणणाऱ्या व्यक्तीने सांगितली INSIDE STORY

Parth Pawar on NCP Merger: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ सदस्य अजित पवार यांचे अचानक निधन झाले. ते उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. त्यांच्या जाण्याने पक्षात आणि राज्यात शोककळा पसरली. अजित दादा म्हणून ओळखले जाणारे हे नेते कायमच लोकांच्या हृदयात राहतील. त्यांच्या निधनानंतर पक्षाने तातडीने नवीन नेत्याची निवड करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राजकीय वातावरणात बदल घडला. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे अशी अजित पवारांची इच्छा होती, असे काही नेत्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीची बदनामी करण्याकरता घाईनं विलीनीकरणाचा मुद्दा उचलला गेलाय का? असा प्रश्न सुरज चव्हाण यांनी उपस्थित केलाय. दरम्यान पार्थ पवारही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही असल्याचे विधान अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी केलंय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवारांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्ष नेते म्हणून निवड केली. सुनेत्रा या अजित पवारांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी आधीही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी ही निवड प्रस्तावित केली, तर छगन भुजबळ यांनी त्याला पाठिंबा दिला. पक्षातील सर्व नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ही निवड पक्षाच्या एकजुटीचे प्रतीक आहे आणि महिलांना राजकारणात मोठी संधी देणारी ठरली. सुनेत्रा यांच्या निवडीमुळे एनसीपीला नवीन दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री 

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्याच्या राजकीय इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की एका महिलेला इतक्या उच्च पदावर नियुक्ती मिळाली. यामुळे महिलांच्या राजकीय सहभागाला प्रोत्साहन मिळेल आणि नवीन पिढीला प्रेरणा देईल. अजित पवारांच्या वारसदार म्हणून सुनेत्रा यांनी हे पद स्वीकारले

किरण गुजर काय म्हणाले?

पार्थ पवार यांनी स्वत: गोविंद बागेत येऊन दोन्ही राष्ट्रवादीतला संवाद पुन्हा सुरू केला असून लवकरच अजित दादांच्या अंतिम इच्छेनुसार या दोन्ही एकञ येतील, असा खुलासा अजितदादांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी झी 24 तासशी बोलताना केलाय. 17 तारखेच्या बैठकीबाबत प्रदेश पातळीवरील नेतृत्वाचं मत वेगळं पडलं असलं तरी मला माहिती आहे की होय ती बैठक झाली असून 21 जानेवारीला दादांनी मला बोलावून याबाबत कल्पना दिली होती आणि जरी दादा अकाली गेले असले तरी पवार कुटुंबिय दादांची ती इच्छा पूर्ण करणारच, असंही गुजर म्हणालेत. 

स्वत: पार्थ पवार देखील या पार्टी मर्जिंगच्या प्रक्रियेसाठी अनुकूल आहेत, आजच्या गोविंद बागेच्या बैठकीतही त्यांनी पवार साहेबांना हेच सांगितले असंही गुजर म्हणालेत. याबाबत ते लवकरच प्रदेश पातळीवरही बोलणार असल्याने आता आमच्या दोन्ही पार्टी आणि पवार कुटुंबात मर्जिंगबाबत कोणताही संभ्रम राहिलेला नाही.राहिला प्रश्न आजच्या शपथविधीचा तर किरकोळ कम्युनिकेशन गँप होता तोही आता मिटलाय, असंही गुजर म्हणालेत.अजितदादांना राजकारणात आणण्यात किरण गुजर यांनीच पुढाकार घेतला होता आणि दादांचं बारामतीतलं काम तेच बघायचे म्हणूनच गुजर यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. 

काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल, असे राज ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण  पटेल नाही !, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp