digital products downloads

Po*n फिल्म रॅकेट… पोलिस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटरवर असलेल्या हॉटेलमध्ये छापा पडला अन्..

Po*n फिल्म रॅकेट… पोलिस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटरवर असलेल्या हॉटेलमध्ये छापा पडला अन्..

Crime News: मिरा रोडमध्ये मागील काही काळापासून सातत्याने अश्लील चित्रपटांच्या निर्मितीची प्रकरण समोर येत असतानाच आता अशा प्रकरणांच्या संख्येत नव्यानं भर पडली आहे. मिरा रोडमध्ये पुन्हा एकदा पॉर्न फिल्म रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यावेळेस पोलिसांनी हॉटेल ‘सोना’वर धाड टाकली असता हे रॅकेट उघडकीस आलं. सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिल्यानंतर छापेमारी करण्यात आली. 

Add Zee News as a Preferred Source

पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटरवर…

मिरा रोडमध्ये पुन्हा पॉर्न फिल्म रॅकेटचा खळबळजनक प्रकार समोर आला असून सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एका मोठ्या पॉर्न फिल्म रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काशिमीरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या ‘हॉटेल सोना’ म्हणजेच एसके रेसिडेन्सीमध्ये हा अनैतिक प्रकार सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दोन संशयास्पद रूम्सला टाळं लावलं असून येथील रजिस्टरमधील नोंदी जप्त केल्या असून, निर्मात्यांनी हे शूट केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता झोनल डीसीपींकडे सर्व पुरावे सोपवण्यात आले असून, लवकरच गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

यापूर्वी पाली व्हिलेज रिसॉर्ट क्लबमध्ये पॉर्न व्हिडिओ शूटिंगचा प्रकार

यापूर्वी पाली व्हिलेज रिसॉर्ट क्लबमध्ये पॉर्न व्हिडिओ शूटिंग रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते. मिरा-भाईंदर, वसई-विरार  पोलिसांनी छापा मारुन या प्रकरणामध्ये दोघांना अटक केलेली. रिसॉर्टच्या रूम्समध्ये अश्लील चित्रीकरण होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर छापेमारी करुन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

डायरेक्टर-प्रोड्यूसर जोडप्याला अटक

मीरा रोडमध्येच पॉर्नोग्राफिक फिल्म्स तयार करून अपलोड करणाऱ्या डायरेक्टर-प्रोड्यूसर जोडप्याला काही काळापूर्वी अटक करण्यात आली होती. मीरा रोडमध्ये शूटिंग होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी छापा मारला आणि जोडप्याला ताब्यात घेतले.

रिसॉर्टच्या रूम्समध्ये अश्लील चित्रीकरण

यापूर्वी पाली व्हिलेज रिसॉर्ट क्लबमध्ये पॉर्न व्हिडिओ शूटिंग रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी छापा मारुन या प्रकरणामध्ये दोघांना अटक केलेली. रिसॉर्टच्या रूम्समध्ये अश्लील चित्रीकरण होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर छापेमारी करुन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

ठाकूर मॉल जवळही कारवाई

काशीमिरा हायवेवर ठाकूर मॉल जवळ रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी बॉलिवूड सेलिब्रिटी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. महिलांवरील अत्याचारविरोधी पथकाने केलेल्या छापेमारीमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता.

निवासी कॉम्प्लेक्समध्ये वर्षानुवर्षे सेक्स रॅकेट

मीरा रोडमध्ये सेक्स रॅकेटची प्रकरणं मागील पाच वर्षांपासून सातत्याने समोर येत आहेत. 2021 मध्येही फिल्म प्रोड्यूसर खानयालाल बालचंदानी आणि दोन साथीदारांना सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.  खानयालाल बालचंदानी आणि दोन साथीदा मीरा रोडच्या निवासी कॉम्प्लेक्समध्ये वर्षानुवर्षे सेक्स रॅकेट चालत होते. गुप्त माहिती मिळाल्यानंतर खोटे ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा मारला. दोन महिलांची सुटका या मोहिमेदरम्यान करण्यात आली.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp