digital products downloads

‘सीटबेल्ट बांधलेला मृतदेह…’; अजित पवारांचा मृतदेह सर्वात आधी पाहणाऱ्या व्यक्तीने सांगितला घटनाक्रम

‘सीटबेल्ट बांधलेला मृतदेह…’; अजित पवारांचा मृतदेह सर्वात आधी पाहणाऱ्या व्यक्तीने सांगितला घटनाक्रम

The Man Who First Saw Ajit Pawar Dead Body: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये निधन झालं. या अपघातामध्ये एकूण सहा जणांचं निधन झालं आहे. अजित पवारांच्या अपघाताला चार दिवस लोटून गेले असले तरी त्यांनी प्राण गमावलेल्या विमान अपघातानंतर घटनास्थळी काय स्थिती होती, नेमकं काय घडलं याबद्दलची चर्चा अजूनही सुरु आहे. असं असतानाच सध्या सोशल मीडियावर अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पहिल्या काही व्यक्तींपैकी एक असलेले अजित पवारांची मागील तीन दशकांहून अधिक काळापासून साथ देणाऱ्या बारामतीमधील सहकाऱ्याने संपूर्ण घटनाक्रम एका मुलाखतीत सांगितला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवारांच्या पार्थिवाजवळ सगळ्या आधी कोण पोहोचलं?

किरण गुजर हे बारामतीमध्ये 1995 पासून अजित पवारांसोबत काम करतात. ज्या दिवशी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. त्यावेळी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी विमानतळावर किरण गुजरच हजर होते. विमान अपघात झाल्यानंतर सर्वात आधी अजित पवारांच्या मृतदेहाजवळ गुजरच पोहोचले. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण गुजर यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. “सकाळी जायचं होतं तर फोनवर म्हटले की असं असं जायचं आहे. तर मी त्यांना नेहमी अशा दौऱ्याआधी सगळे कागद तयार करुन द्यायचे. जिल्हा परिषदेचं प्लॅनिंग केलं होतं. पहिली प्रचारसभा होती. कागदपत्रांचा एक सेट राहिला होता. त्यानंतर म्हटलं तिथूनच बाहेर पडू. 15 मिनिटं लेट आलं. विमान आलं. पण त्याचा वेग इतका होता की ते धावपट्टी क्रॉस करुन गेले. ते टर्न होऊन आलं,” असं गुजर म्हणाले.

विमानाने तीन पटल्या मारल्या

अपघाताबद्दल बोलताना, विमानाचा वेग कमी झाला नाही. विमानाने तीन पटल्या मारल्या. वेग कमी न झाल्याने ते धावपट्टीवर उतरायला हवं होतं ते तिरक्या बाजूला क्रॅश झालं. त्या ठिकाणी मोठा जमिनीचा कट होता. 50 ते 100 फूट दरी म्हणू शकतो आपण. मला ते सगळं समोर दिसलं. मी तसाच गेलो तिकडे,” असं किरण गुजर म्हणाले.

चेअरला सीटबेल्ट, मृतदेह बाहेर पडला

पुढे बोलताना किरण गुजर यांनी, “माझ्यासोबत अजित पवारांचा बॉडीगार्ड आणि पीए तसेच एक सहकारी होते. आम्ही तिथे उतारावरुन खाली जात होतो तेवढ्यात स्फोट व्हायला सुरुवात झाली. आतून बाहेर फेकलं गेली पहिली एक चेअर जिला सीटबेल्ट बांधला होता आणि बॉडी (मृतदेह) बाहेर पडली. ती पडल्या पडल्या मी तिथून 50 फुटांवर उभा होतो. धुराचे लोट अंगावर यायला लागले. तिथेच कळलं हे दादा आहेत,” असं सांगितलं.

कसं ओळखलं?

दादाच्या नखापासून केसापर्यंत सगळ्या गोष्टी 46 वर्षांपासून ओळख आहे. जेव्हा आपली व्यक्ती असते तेव्हा तिला ओळखायला वेगळी नजर नाही लागतं.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp