digital products downloads

अजित पवारांसाठी ‘ते’ विमान कोणी आणि का निवडलं? पायलटचं मद्यपान अन् जळालेल्या सीटचा फोटो

अजित पवारांसाठी ‘ते’ विमान कोणी आणि का निवडलं? पायलटचं मद्यपान अन् जळालेल्या सीटचा फोटो

Ajit Pawar Death in Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये निधन झालं. विमान लॅण्डींगच्या वेळी झालेल्या अपघातामध्ये अजित पवारांसोबत विमानातील अन्य पाच जणांचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे महाराष्ट्रातील लाखो राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांबरोबरच सर्वसामान्यांनाही मोठा धक्का बसला. अजित पवारांसारखा कर्तुत्ववान नेता गमवल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात असतानाच आता या अपघातासंदर्भात अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांकडूनच शंका उपस्थित केली जात आहे. अजित पवारांचा वरदहस्त असल्याने विधान परिषद आमदार झालेल्या अमोल मिटकरींनी आता अजित पवारांचा अपघात ज्या विमानामुळे झाला त्या विमानाची दर्जा आणि अपघात झाला तेव्हा विमान उड्डाण करणाऱ्या वैमानिकासंदर्भात आता शंका उपस्थित केली आहे. यापूर्वीच मिटकरींनी अपघातासंदर्भात काही प्रश्न आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन पोस्ट केलं होते. आता अजित पवार ज्या विमानात बसलेले त्या विमानाच्या अपघातानंतर घटनास्थळी सापडलेली जळलेल्या सीटचा फोटो शेअर करत मिटकरींनी काही प्रश्न विचारले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

कोणते प्रश्न पोस्ट केले?

“आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले,” असं म्हणत मिटकरींनी देवगिरी बंगल्यावरील अजित पवारांच्या निवासस्थानी असलेल्या रिकाम्या खुर्चांचे फोटो पोस्ट केलेले. “मृत्यूच्या अगोदरच्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय,” असं म्हणत मिटकरींनी “प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही,” म्हणत पाच प्रश्न विचारले आहेत. मिटकरींनी विचारलेले प्रश्न खालीलप्रमाणे: 

> अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
> सहावी व्यक्ती कुठे गेली?
> टेक ऑफआधी प्रवासी यादी डिजीटली नोंदलेली असते, मग विसंगती का?
> एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?
> एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

अजित पवारांसाठी 'ते' विमान कोणी आणि का निवडलं? पायलटचं मद्यपान अन् जळालेल्या सीटचा फोटो

आता शंका विमान आणि वैमानिकाच्या दर्जावर

मिटकरींच्या या पोस्टची प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर आता अमोल मिटकरींनी विमानाचा दर्जा आणि वैमानिकांच्या इतिहासावरुन शंका उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. “उपमुख्यमंत्र्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या लेरजेट 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई/निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, सीआरएम व सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली? याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय?” असे सवाल मिटकरींनी विचारले आहेत. या पोस्ट सोबत त्यांनी विमान अपघातानंतर घटनास्थळी आढळून आलेली विमानातील जळलेल्या खुर्चीचा फोटो शेअर केला आहे.

अजित पवारांसाठी 'ते' विमान कोणी आणि का निवडलं? पायलटचं मद्यपान अन् जळालेल्या सीटचा फोटो

मिटकरींबरोबरच रुपाली ठोंबरेंनीही या अपघाताच्या चौकशीची मागणी केली असून काही वेगळी कारणं यामागे नाहीत ना याची चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp