digital products downloads

नवे पदाधिकारी येण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर महापालिकेत खांदेपालट: वसंत भोयेंकडे ‘पाणी’, तर सविता सोनवणेंकडे ‘अतिक्रमण’ – Chhatrapati Sambhajinagar News

नवे पदाधिकारी येण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर महापालिकेत खांदेपालट:  वसंत भोयेंकडे ‘पाणी’, तर सविता सोनवणेंकडे ‘अतिक्रमण’ – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर यांच्यासह नवीन लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रशासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी मोठे फेरबदल केले आहेत. निवडणूक प्रक्रिया संपताच रिक्त पदे भरण्यावर आणि महत्त्वाच्या विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर त्यांनी भर दिला आहे. अभियंत्यांच्या खांद्यावर ‘रस्ता’ अन् ‘यांत्रिकी’ रस्ते विकासाचा विभाग आता कार्यकारी अभियंता बाळासाहेब शिरसाट यांच्या नियंत्रणाखाली असेल. त्यांना उपअभियंता म्हणून संजय कुलकर्णी, आरती नवगिरे आणि लक्ष्मीकांत कोतकर सहकार्य करतील. कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) म्हणून सचिन वाईकर, तर कार्यकारी अभियंता विजय गोरे यांच्याकडे घनकचरा स्थापत्य, बीओटी आणि इमारती हे विभाग सोपवण्यात आले आहेत. झोन, वॉर्ड स्तरावर बदल झोन 1 मध्ये अर्चना राजपूत यांची वॉर्ड अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय झोन 4 मध्ये उदय मानवतकर, झोन 7 मध्ये विलास भणगे आणि झोन 10 मध्ये लता पुजारी यांना जबाबदारी दिली आहे. सहायक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्याकडे पर्यटन, कामगार आणि पर्यावरण हे विभाग असतील, तर उदय मोकाशी कर नियंत्रण कक्ष पाहतील. मनपात करण्यात आलेल्या नियुक्त्या पाणीपुरवठा : शहराच्या अत्यंत कळीच्या पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण धुरा कार्यकारी अभियंता वसंत भोये यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
अतिक्रमण हटाव : या विभागाची सूत्रे आता उपायुक्त सविता सोनवणे सांभाळतील.
कामगार विभाग : या विभागाचा अनुभव असलेले उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांची पुन्हा एकदा या पदावर वर्णी लागली आहे.
दक्षता कक्ष : महत्त्वाच्या असलेल्या दक्षता कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा एम. बी. काझी यांना पसंती दिली.
नगररचना व गुंठेवारी : उपअभियंता संजय चामले यांची परत नगररचना विभागात बदली करून त्यांच्याकडे गुंठेवारी कक्षाची जबाबदारी दिली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp