
Ajit Pawar Death Raut Slams Fadnavis: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा केल्याचा शरद पवारांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावला आहे. अजित पवार हे माझ्याशी अनेक विषयांवर बोलायचे. असं काही असतं तर त्यांनी मला नक्कीच कल्पना दिली असती असती असं फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. मात्र फडणवीसांच्या या विधानावरुन संजय राऊतांनी फडणवीसांनाच आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
फडणवीस काय म्हणाले?
12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची घोषणा केली जाणार होती असं शरद पवारांबरोबरच जयंत पाटील आणि इतरही अनेक त्यांनी सांगितलं. यासंदर्भात अजित पवारांबरोबर अनेक बैठकांमध्ये चर्चा झाल्याचा संदर्भ देण्यात आलं. यावर बोलताना फडणवीसांनी, “समजा अजित पवार साहेब जर विलीनीकरणसाठी चर्चा करत होते तर ते कोणतीही चर्चा भाजपाला न सांगता करतील का? चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपाला सांगितलं असतं. ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. चर्चा करायची, नाही करायची, विलिनीकरण करायचं यासंदर्भात सर्वस्वी 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. फक्त त्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी इतकी अपेक्षा असेल. आणि ते करतात आणि पुढेही करतीत,” असं म्हटलं.
…तर याचा अर्थ अजित पवारांचा फडणवीसांवर विश्वास नसेल
अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त नवी दिल्लीमध्ये असलेल्या संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांना अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाल्याची आपल्याला कोणतीही कल्पना दिली नसल्याच्या फडणवीसांच्या विधानावरुन प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर संजय राऊतांनी, “देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक विषयाची चर्चा होते असं नाही ना. अजित पवार स्वत:च्या पक्षाचे प्रमुख आणि नेते होते. ते त्यांच्या मर्जीने भाजपाबरोबर गेले. त्यांना असं वाटलं असेल की भाजपा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. अजित पवार फडणवीसांशी खासगीत बोलायचे असं बोललो तर आम्ही? जर त्यांनी फडणवीसांशी चर्चा केली नसेल तर याचा अर्थ त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल,” असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> ‘त्या’ विमानाचा घातपात? शंका घेत राऊत म्हणाले, ‘अजित पवार वारंवार सांगत होते माझ्याकडे…’
अजित पवारांच्या आमच्याशीही…
“त्यांना स्वगृही परत जायचं असेल तर फडणवीसांशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांचा पक्ष हा मुंबई महाराष्ट्र तोडण्याच्या बाजूने आहे. फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्रच्या विरोधात आहे. अशा वेळेस अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवर काम करणार नाही, हे आम्हाला माहितीये. अजित पवारांच्या आमच्याशीही चर्चा व्हायच्या ना. फडणवीसांनी आत्मपरिक्षण करावं की अजित पवार त्यांच्याशी का बोलले नासतील. इतर लोक बोलतात ते चुकीचं आणि फडणवीस बोलतात ते बरोबर असं म्हणणं चुकीचं आहे,” असं मत राऊतांनी मांडलं.
नक्की वाचा >> अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान घडला भयंकर प्रकार! 25 लाखांचा फटका; 8 हजार पोलीस असतानाही…
…तर त्यांच्या नावाने बिलं फाडू नयेत
“अजित पवार मूळ प्रवाहात येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षात त्यासंदर्भात हलचाली सुरु होत्या. हे फडणवीसांनाही माहितीये. आज अजितदादा नाहीत तर त्यांच्या नावाने बिलं फाडू नयेत,” असा खोचक सल्लाही राऊतांनी दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



