
NCP Merger Meeting: अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजाणात भरुन न येणारी पोकळी निर्माण झालीय. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या. दुसऱ्य बाजुला राष्ट्रवादी विलिनिकरणाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. अजित पवारांच्या उपस्थित जयंत पाटलांच्या घी एक बैठक झाली. या बैठकीत काय घडलं? याबद्दल सुत्रांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विलिनिकरणासंदर्भात जयंत पाटलांच्या घरी रात्री 9 ते 12 अशी 3 तास चर्चा झाली होती. या बैठकीत काय घडलं?, याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोराली आहे.जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका मांडण्यात आली होती तसेच पक्ष एकत्र झाल्यास कळवा मुंब्राच्या मतदारांबाबत काय भूमिका घ्यावी किंवा काही वेगळा पर्याय होऊ शकतो का? याबाबत देखील चर्चा झाली होतो, अशी माहिती सुत्रांनी दिली.
अशोक पवार यांच्या विरोधात घड्याळाच्या चिन्हावर माऊली कटके निवडून आले होते त्यामुळे एकत्र झाल्यास त्यांच समायोजन कसं केलं जाणार तसेच अडचणीत असलेला घोडगंगा साखर कारखाना सुस्थितीत कसा आणला जाणार? याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सूत्र सांगतात
माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागणार त्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असावी याबाबत चर्चा पार पडली होती. हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख विरोधक अजित पवारांचे निकटवर्तीय मंत्री दत्तामामा भरणे आहेत ते आमदार राहणार असतील हर्षवर्धन पाटील यांचं आणि त्यांच्या मुलीच नियोजन कसं केलं जाईल याबाबत चर्चा पार पडली होती त्याचाच पुढचा भाग म्हणून अंकिता पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी सांगण्यात आलं होतं असंही कळतय. पक्षातील नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत पुढच्या चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
विलीनीकरण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणारी बैठक 22 डिसेंबरला पार पडली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यास अडचण निर्माण होऊ शकते अशा नेत्यांना जयंत पाटील यांच्या घरी बोलवण्यात आलं होतं.बैठकीला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, हर्षवर्धन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. आधी सर्व नेत्यांची एकत्रित बैठक केली आणि त्यानंतर प्रत्येकाशी अजित पवारांनी वन टू वन चर्चा केली होती यात पाटील यांच्या निवासस्थानी रात्री 9 ते 12 दरम्यान ही महत्त्वाची बैठक पार पडली होती. पक्षातील नेत्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते हे काहीसे पक्षाकडून दूर गेल्याचे दिसून आले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



