digital products downloads

महाराष्ट्रासाठी 2,39,26,00,00,000 रुपयांचा रेल्वे बजेट; कोकण रेल्वे, हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन, लोकल ट्रेनच्या सुविधांसह मोठे प्रोजेक्ट

महाराष्ट्रासाठी 2,39,26,00,00,000 रुपयांचा रेल्वे बजेट; कोकण रेल्वे, हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन, लोकल ट्रेनच्या सुविधांसह मोठे प्रोजेक्ट

Maharshtra Railway Budget : अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचं पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, एमयुटीपीसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी निधी देण्यात आलाय. शिवाय ग्रामीण रस्ते,सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पांसाठीही हजारो कोटी रुपये देण्यात आलेत.  महाराष्ट्रासाठी 2,39,26,00,00,000 रुपयांचा रेल्वे बजेट ठेवण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्रासाठी 2,39,26,00,00,000 रुपयांचा रेल्वे बजेट ठेवण्यात आला आहे. कोकण रेल्वे, हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन, लोकल ट्रेनच्या सुविधांसह मोठे प्रोजेक्ट मार्गी लागणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 1 लाख 70 हजार कोटींची रेल्वेची काम सुरू आहेत. अर्थसंकल्पात दोन हाय स्पीड ट्रेन महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहेत. या हायस्पीड ट्रेनमुळे मुंबई पुणे या हायस्पीड ट्रेनमुळे हे अंतर केवळ 48 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे   पुणे हैदराबाद हे अंतर हायस्पीड ट्रेनमुळे फक्त एक तास 55 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. 

वाढवण बंदराला रेल्वे कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेची क्षमता वाढवणे खूप जास्त गरजेचा आहे. कारण पूर्ण कोस्टल एरियाला जोडण्याचा काम कोकण रेल्वे करते.  कोकण रेल्वे ट्रॅक डबल करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा  वापर करत नवीन प्रोजेक्ट प्रपोजल तयार करण्यात आला आहे.  पुढच्या वर्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू  केला जाण्याचा मानस आहे.

 बुलेट ट्रेन चा एक महत्त्वाचा ब्रेक थ्रू केला जाणार आहे.  नवीन टेक्नॉलॉजी नुसार  हा प्रोजेक्ट आम्ही केला आहे. साडेतीनशेच्या स्पीडवर बुलेट ट्रेन चालणार. त्यामुळे  त्यांचं डिझाईन स्पेशल पद्धतीने करण्यात आलेला आहे.  देशभरात सात हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहेत. त्यातले 2 महाराष्ट्रात होत आहेत. रेल्वेच्या ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत कनेक्ट केलं जाणार. त्यामधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक  वाढवली जाण्याचा प्रयत्न असणार आहे.   238 एसी लोकल ट्रेन  मुंबईकरांच्या 2029 पर्यंत सेवेत आणल्या जाणार आहेत.   जून महिन्यापर्यंत पंधरा डब्याच्या लोकल धावण्यासाठी फलाट तयार करण्यात येणार आहेत.   येत्या मार्च महिन्यापर्यंत दोन सेफ्टी डोअर च्या लोकल ट्रायल बेसिसवर धावल्या जाणार. महाराष्ट्रात 132 अमृत भारत स्टेशनचे निर्मिती केली जाणार आहेत.   कोकण रेल्वेच्या ट्रॅक्टर दुहेरीकरण प्रगतीपथावर लवकरच याबाबत अप्रुवल मिळाल्यानंतर  कोकण रेल्वेची मार्गिका दुहेरी करण्यात येणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp