
बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपाध्याय यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांसह या परिसरातील विविध संशयास्पद ठिकाणांवर स्वतः छापे टाकून गांजा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कारवाईचे व्हिडिओ… या धाडसत्रादरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका विशिष्ट समुदायातील व्यक्तींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात गृहखात्याची जबाबदारी भाजपकडेच असताना स्वतः सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला रस्त्यावर उतरून ही कारवाई करावी लागल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



