digital products downloads

चेक पोस्ट की लुटमारीचा नाका? महाराष्ट्राच्या ‘या’ सीमेवर चाललंय काय? खासदाराने स्वतःच…

चेक पोस्ट की लुटमारीचा नाका? महाराष्ट्राच्या ‘या’ सीमेवर चाललंय काय? खासदाराने स्वतःच…

Maharashtra Chhattisgarh Border:  महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील गोंदिया जिल्ह्यातील देवरी चेक पोस्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राष्ट्रीय महामार्ग 53 वर असलेला हा तपासणी नाका ट्रक चालकांसाठी मोठी अडचण ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. सीमारेषेवर येणाऱ्या-जाणाऱ्या मालवाहू वाहनांकडून बेकायदेशीर पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. अखेर या गंभीर प्रकरणाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले आणि प्रत्यक्ष पाहणीमुळे संपूर्ण प्रकार उजेडात आला. या घटनेमुळे वाहतूक व्यवस्था, प्रशासनाची भूमिका आणि चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Add Zee News as a Preferred Source

देवरी चेक पोस्टवर छत्तीसगडमधून महाराष्ट्रात येणारे तसेच महाराष्ट्रातून बाहेर जाणारे ट्रक थांबवले जातात. अनेक चालकांच्या म्हणण्यानुसार, येथे दररोज 200 ते 900 रुपयांपर्यंत पैसे देण्यास भाग पाडले जाते. हे पैसे कोणत्याही अधिकृत पावतीशिवाय घेतले जात असल्याचा आरोप आहे. दररोज हजारो ट्रक या मार्गावरून जात असल्याने या अवैध वसुलीमुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते.

काही निवडक चालकांकडे खास कार्ड दिले जात असल्याचेही समोर आले आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड आहे, त्यांना अडवले जात नाही, तर इतरांकडून सक्तीने रक्कम घेतली जाते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून, कोणी आवाज उठवला तर दंडाची किंवा त्रास देण्याची भीती दाखवली जाते, असे चालक सांगतात. वेळेत माल पोहोचवायचा दबाव असल्याने नाईलाजाने पैसे द्यावे लागतात, असेही ते नमूद करतात.

या तक्रारींची दखल घेत भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट देवरी चेक पोस्टला भेट दिली. अचानक झालेल्या या पाहणीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. प्रत्यक्ष ठिकाणी परिस्थिती पाहून खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतक्या उघडपणे पैसे घेतले जात असतील, तर यामागे मोठे पाठबळ असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

खासदारांनी या प्रकरणाचा मुद्दा संसदेत मांडण्याचा इशारा दिला असून, गरज पडल्यास सखोल चौकशीची मागणी करण्यात येईल, असे सांगितले आहे. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

आधीच डिझेलचे वाढते दर, टोल नाके आणि महागाईमुळे अडचणीत असलेल्या ट्रक चालकांसाठी ही अवैध वसुली अतिरिक्त ओझे ठरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात ठोस पावले उचलणार का, की देवरी चेक पोस्टवरील हा प्रकार असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp