
Ajit Pawar Death In Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर या अपघातासंदर्भात राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊतांच्या आधीच अजित पवारांच्या पक्षाचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरींनीही या अपघातासंदर्भात शंका उपस्थित करताना हा घातपात तर नाही ना अशी शंका घेतली आहे. मिटकरींनी विचारलेल्या प्रश्नांची री ओढत राऊतांनी मिटकरींनी उपस्थित केलेल्या शंका गंभीर स्वरुपाच्या असल्याचं म्हटलं आहे. राऊतांनी हा मुद्दा राज्यसभेतील चर्चेदरम्यानही पटलावर आणल्याचं समर्थन केलं. आता याच विषयावर राज्यातील एका मोठ्या नेत्याने भाष्य केलं आहे.
एक उद्योगपती येऊन दोन पक्षात समेट करतोय
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका, दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण यासारख्या प्रश्नांवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरमध्ये पत्रकाराशीं चर्चा केली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात बोलताना, “त्यांच्या अंतर्गत बाबीत बोलण्याची गरज नाही. मात्र आता एक उद्योगपती येऊन दोन पक्षात समेट करत आहेत. मात्र हे विलीनीकरण होत असताना एनडीएला पाठिंबा द्यावा यावर एकमत होणे बाकी आहे. मध्यस्थी गुजरातचे आणि देशातील एक मोठे उद्योगपती प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे आणि त्यातून हे विलीनीकरण झाल्यानंतर पुढे एनडीए बरोबरच या मंडळींनी राहावे अशा अटी आणि शर्ती घातल्या आहेत,” असा दावा केला आहे.
नक्की वाचा >> अजित पवारांचा विमान अपघात ‘ऑपरेशन लोटस’चा भाग? खासदाराचा सवाल; ‘भाजपला विरोध करणारा जीव गमावतो किंवा..’
अनेक गोष्टी शंका घेण्यासारख्या
संजय राऊतांनी अजित पवारांच्या निधनासंदर्भात केलेल्या विधानांसंदर्भात वडेट्टीवारांना विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी, “या संदर्भात फार मोठा असंतोष जनतेमध्ये सुद्धा आहे. लोकांना अजित दादांचा मृत्यू आणि जो अपघात झाला तो पटत नाही. त्यामुळे हे अनेक तर्कवितर्क सगळीकडे लावले जात आहेत. काहीजण म्हणतात अजितदादा अजूनही जिवंत आहेत. कोणी म्हणतात पायलट वेळेवर का बदलला? अशा अनेक गोष्टी शंका घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याचा, लोकप्रिय नेत्याचा मृत्यू होतो त्यावेळी संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूध का दूढ आणि पाणी का पाणी होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने चौकशी झाली पाहिजे,” असं मत व्यक्त केलं आहे.
नक्की वाचा >> अजित पवारांचा अपघाताचं गूढ वाढलं! मृतदेहाची ओळख ज्याने पटली ‘ती’ गोष्टच आता सापडेना?
…म्हणून सीआयडी नको सीबीआय चौकशी करा!
अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी करण्याच्या मागणीसंदर्भात वडेट्टीवार यांनी खोचक उत्तर दिलंय. “राज्यात दीडशे सीआयडी चौकशी सुरू आहे. आयडी चौकशी म्हणजे वेळ काढूपणा आहे. त्यात पाच टक्के पण देखील काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे ही चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे,” असंही वडेट्टीवार म्हणालेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



