
Prafull Patel On Ajit Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विलिनिधीकरणाच्या चर्चा जोर धरु लागल्या. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण होणार यावरुन राज्यभरात खलबतं सुरु झालीयत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटले नको पाटील हवा, असं विधान केल्यानंतर या चर्चांना आणखी जोर मिळाला. प्रफुल्ल पटेल अध्यक्ष होणार, अशी चर्चा असताना राज ठाकरेंचे हे विधान आले होते. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार आमचे पक्ष स्थापनेपासून महत्त्वाचे नेते राहीलेत. ते राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहीले.शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष आणि नंतर अजित पवार यांच्या पक्षातून केले आणि आजही कार्यरत आहे.मागील सहा सात दिवसांत अजित दादांच्या निधनानंतर दुःखाने सांगावे लागतेय की अनेक वेगवेगळ्या माध्यमातून काही लोकं उलट सुलट विधान करायला लागले आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या निर्णयामागे लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधानं केल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
एनसीपी विधीमंडळ नेता कोणाला निवडावं हा आमच्या पक्षाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. सर्वांच्या भावनेचा विचार करून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान केलं आहे. कोणी म्हणतं घाई केली , कोणी म्हणतं शोक काळ आहे.
किती दिवस शोक पाळावा? हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. मी सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो. त्यांच्या दोन्ही सुपुत्र पार्थ आणि जय पवार होते. आम्ही सांत्वना देत सांगितलं की एनसीपी खंबीरपणे तुमच्या आणि पक्षाच्या मागे उभा आहे.
जनतेची आणि पक्षाची भावना
जनतेची आणि पक्षाची भावना होती की त्यांनी जबाबदारी स्वीकारावी. त्यांनी मोठा पणा दाखवून सांगितले की दादांचा स्वभाव थांबण्याचा नव्हता. आमच्या विनंतीला सुनेत्रा पवारांनी मान दिला. पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो. ते झाल्यावर शपथविधी झाला. आम्ही आमच्या पक्षाच्या निवडणार की दुसरा कोणाला निवडणार? असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला.
‘असं बोलणा-यांना लाज वाटायला पाहीजे…’
एक केंद्रीय मंत्री चुकून बोलले. त्यांना कोणी चुकीची माहिती दिली. विधिमंडळ प्रक्रीयेची पालन करण्याची जबाबदारी माझ्यावर आणि सुनिल तटकरेंवर आहे. आम्ही लगेच सुनेत्रा पवारांबाबत निर्णय घेतला. पण बाहेरचे लोकं यात पडले. जे कधी निवडणूकीत उभे राहीले नाहीत ते लोकं आमच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. माझे वडील आणि मी जनतेतून निवडून गेलो. असं बोलणा-यांना लाज वाटायला पाहीजे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. पक्षाचा अध्यक्ष पदाचा निर्णय योग्य व्यक्ती होईल. माझ्या शिवाय होईल. मी राहणार नाही. हे मी स्पष्ट करतोय.आमच्या बद्दल संभ्रम पसरवायला लागलेयत अशी टीका त्यांनी केली.
‘मत विभाजन होऊ नये म्हणून…’
मी अजित पवारांच्या सोबत सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो.आमच्याकडे निर्णय जे काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आमच्या मर्यादेत राहणार आहे. त्या पेक्षा वेगळी कोणतेही चर्चा नाही. यापूर्वी दादांनी स्वतः मुलाखत दिलीय. स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक सुरू झाली. अहिल्यानंगर मध्ये आम्ही भाजप सोबत नाशिकमध्ये आम्ही शिंदे शिवसेने सोबत लढलो.दादांनी आम्हाला सांगितले की इतर ठिकाणी सगळे वेगवेगळे लढत आहोत, मत विभाजन होऊ नये म्हणून शरद पवारांशी बोलून समेट घडवू. म्हणजे स्थानिक ठिकाणी अडचण होणार नाही. फक्त हे स्थानिक स्वराज्य निवडणूका बाबत विषय होता, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
‘मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही’
माझ्याकडे तात्पुरते नेतृत्व आहे. मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. राज ठाकरे किंवा इतर कोणाचा आमच्या पक्षाशी काय संबध? असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला. आमच्या समोर विलिनीकरणाचा विषय नाही. अजितदादांनंतर कोण? याची जबाबदारी माझी आहे. आमची पार्श्वभूमी समजून न घेता उलटसुलट चर्चा सुरु झाल्याचे पटेल म्हणाले.
‘आमचा पहिला निर्णय योग्यच’
आम्ही पहिला निर्णय योग्यच घेतला. जनभावनेचा आदर ठेवून आम्ही निर्णय घेतला. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल आमच्या मनात आदर आहे. आमचा नेता आम्ही निवडणार नाहीतर कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अजित पवारांच्या निधनानंतर आमच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. पक्षाशी संबंधित नसणारेही टीका करु लागले.मी माझ्या पक्षासंदर्भात बोलणार इतरांच्या नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या पक्षाच्या प्रश्नाला उत्तर दिले. अर्थ मंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यांनी सांगितले की. सुनेत्रा पवार नवीन आहेत. बजेट समोर आहे. त्यांना अडचण होऊ नये. मी काहीवेळ हे मंत्रालय सांभाळतो, असे म्हणाल्याचे पटेल म्हणाले.
बिघाड की इंजिन फेल?
मी विमान खात्याचा मंत्री राहीलो आहे. माझ्याच काळात अशा अपघाताची चौकशी करण्याची स्वायत्त संस्था स्थापन केली होती.ब्लॅक बॅाक्स आणि सर्व माहिती समोर येईल. त्यातून अंदाज लागेल. माझ्या अभ्यासानुसार ते विमान १०० फुटांवर असताना एकदम डावीकडे पलटले आणि कोसळले. त्यांचं आम्हाला आश्चर्य वाटतं. त्यात तांत्रिक बिघाड झालंय का किंवा इंजिन फेल झालंय का? हा प्रश्न आहे. विमान धावपट्टीच्या लाईनवर होते का माहिती नाही. एटीसी टॅावर आणि फायर ब्रिगेडचे लोक असतील का? हा तपासाचा भाग आहे. धुक्याची स्थिती नव्हती पण नेमके काय झालं? हे ब्लॅक बॅाक्स मधून कळेल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



