digital products downloads

लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? कधी आणि का केलीय मागणी?

लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? कधी आणि का केलीय मागणी?

Ajit Pawar Name gave to Ladki Bahin Yoajana :  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला ‘अजित दादांची लाडकी बहीण’ असं नाव द्यावं, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.अजित पवार यांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम जपल्या जाव्यात, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून, ही एक प्रकारची आदरांजली असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे.तसंच, ही योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आवश्यक असल्यास योजनेत काही बदल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे

Add Zee News as a Preferred Source

दरम्यान, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मांडणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.मात्र या मागणीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना, कोणत्याही शासकीय योजनेचं नाव बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळालाच असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही ते म्हणाले. 

(हे पण वाचा – तो क्षण… जेव्हा सुनेत्रा पवारांना कळली अजित पवारांच्या निधनाची बातमी, व्हिडीओ कॉलवर पाहिलं…)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी अपेक्षा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.योजनेचं नाव बदलण्याचा अंतिम अधिकार मंत्रिमंडळालाच आहे, यावर कोणतेही दुमत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव देण्याच्या मागणीवर आता राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या विषयावर नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्मृती जपण्यासाठी लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नावं देण्यात याव अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते ही मागणी करणार आहे.ही योजना अजित पवार यांच्या नावाने करावी अशी सध्या त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे मात्र अधिवेशन दरम्यान ते अधिकृतरिते ही मागणी मांडणार आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp