digital products downloads

आपल्या संसदेत नाही, मग पाकिस्तानमध्ये प्रश्न मांडायचे का?: आदित्य ठाकरेंचा सवाल; राहुल गांधींच्या भूमिकेचे केले समर्थन – Mumbai News

आपल्या संसदेत नाही, मग पाकिस्तानमध्ये प्रश्न मांडायचे का?:  आदित्य ठाकरेंचा सवाल; राहुल गांधींच्या भूमिकेचे केले समर्थन – Mumbai News



देशाच्या संसदेत प्रश्न मांडायचा नाही तर मग कुठे मांडायचा, संसदेत खासदारांनाच बोलू देत नाहीत, आपल्याच संसदेत बोलू दिले जात नाही, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. संसदेत झालेल्या गदारोळावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपल्या संसदेत विषय मांडायचा नाही मग पाकिस्तानच्या संसदेत जाऊन मांडायचा का? की चीनच्या संसदेत जाऊन हा विषय मांडायचा? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, देशाच्या संसदेत बोलू देत नाहीत. आपल्याच संसदेत बोलू दिले जात नाही. नरवणे यांच्या पुस्तकात काय लिहिले आहे हे समोर यायला पाहिजे, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांनी आज बारामती विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या वरळी येथील घरी जाऊन कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर या अपघाताची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. अजित दादा काम करणारा नेता होता आदित्य ठाकरे म्हणाले, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक अॅंगल आहेत, त्यामुळे ते पुढे यायला हवे. चांगला नेता आपण गमावला आहे. 2019-20 पासून अजित पवारांसोबत वेगळा बॉन्ड होता, अजित दादा काम करणारा नेता होता, असे ठाकरे यावेळी म्हणाले. डोकलामचा विषय चीनच्या संसदेत जाऊन मांडायचा का? डोकलाम हद्दीत चीनच्या घुसखोरीवरून संसदेत झालेल्या गदारोळावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आपण आपल्या संसदेत विषय मांडायचा नाही, मग पाकिस्तानच्या संसदेत जाऊन मांडायचा का? तसेच माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकात काय लिहिले आहे, वस्ताव काय होते? ते समोर यायला पाहिजे. हे सरकार राहुल गांधींना का घाबरत आहे? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला आहे. भारत आणि चीनच्या सीमारेषांसंदर्भातील डोकलामचा विषय चीनच्या संसदेत जाऊन मांडायचा का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp