digital products downloads

‘…त्यासंदर्भात काही बोलायचं नाही,’ अमित शाह यांनी पियुष गोयल यांना फटकारलं, भरला सज्जड दम

‘…त्यासंदर्भात काही बोलायचं नाही,’ अमित शाह यांनी पियुष गोयल यांना फटकारलं, भरला सज्जड दम

Amit Shah reprimanded Piyush Goyal: अजित पवारांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार विराजमान झाल्या असताना, पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद मात्र अद्यापही रिक्त आहे. सुनेत्रा पवारांकडेच ही जबाबदारी सोपवली जावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. दरम्यान दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजपा नेते पियुष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा केला होता. मात्र नंतर हे विधान मागे घेतलं होतं. 

Add Zee News as a Preferred Source

अमित शाहांनी भरला सज्जड दम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी पियुष गोयल यांना फटकारलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या विधानामुळेच अमित शाह यांनी पियुष गोयल यांच्याकडे नाराजी व्यक्त करत दम भरला आहे. अमित शाह यांनी पियूष गोयल यांना राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात कोणतंही वक्तव्य न करण्याचा सज्जड दम दिला. त्यानंतर पियुष गोयल यांनी ट्विटर वरून खंत व्यक्त केली. 

पीयूष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं वक्तव्य केलं होतं. पियुष गोयलांच्या वक्तव्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आले होते.

पियूष गोयल यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

दोन्ही राष्ट्रवादींच्या संभावित विलीनीकरणाबाबत विचारलं असता पियूष गोयल यांनी सांगितलं की, “मला स्वत:ला तसं होताना दिसत नाही. मला वाटत नाही तसं काही होईल. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा भाग म्हणून खूप चांगली कामगिरी केली. नेतृत्व आधी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड कऱण्यात आली आहे. शरद पवारांनी लोकांचा विश्वास आणि मतं गमावला असल्याने त्यांना युतीसाठी आमंत्रण मिळेल असं मला वाटत नाही. पिंपरी आणि पुण्यात एकत्र आलेले असतानाही त्यांचा पराभव झाल्याचं पाहिलं. जर अजित पवारांनी महायुतीशी युती केली असती तर ते पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील विजयाचा भाग असते. शरद पवारांशी युती करणं मोठी चूक होती आणि आता हे त्यांच्या पक्षातील लोकांना कळलं आहे”.

“स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील निकालात शरद पवारांशी युती केल्याने त्यांचा मोठा पराभव झाल्याने मला युती होईल असं वाटत नाही. तशी कोणतीही शक्यता नाही. काँग्रेसकडे पाहा….ते ज्यांच्याशी युती करतात तो पक्ष हारतो. आरजेडीचं तसंच झालं आहे. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरेंशी युती केल्यानंतर तिघेही निवडणुकीत हारले. त्यांची प्रसिद्धी आता उरलेली नाही,” असंही त्यांनी म्हटलं.  

पियुष गोयल यांची विधानानंतर जाहीर माफी

“एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली की श्री. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधाने केली, परंतु नंतर मला कळले की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. मी दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल माफी मागतो,” असं त्यांनी म्हटलं आहे. 

प्रफुल्ल पटेलांनी फेटाळला दावा

सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचे मी पाहिले आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही मूल्यांवर आधारलेली संस्था आहे. इतक्या महत्त्वाच्या पदाबाबतचा कोणताही निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेतृत्व, आमदार, समर्पित पदाधिकारी यांच्याशी सखोल सल्लामसलत करून तसेच पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि सदस्यांच्या भावना व सामूहिक इच्छेचा आदर राखूनच घेतला जातो. राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा निर्णयांसाठी ठरलेली आणि संस्थात्मक प्रक्रिया आमच्याकडे आहे, आणि त्याच प्रक्रियेच्या आधारेच कोणताही निर्णय घेतला जातो असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp