digital products downloads

तो क्षण… जेव्हा सुनेत्रा पवारांना कळली अजित पवारांच्या निधनाची बातमी, व्हिडीओ कॉलवर पाहिलं…

तो क्षण… जेव्हा सुनेत्रा पवारांना कळली अजित पवारांच्या निधनाची बातमी, व्हिडीओ कॉलवर पाहिलं…

How Sunetra Pawar Recvied News of Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. 28 जानेवारी, बुधवारी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट  पिंकी माली, पायलट सुमित कपूर आणि सह-पायलट शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला. पण या दुःखद काळातील सर्वात त्रासदायक क्षण म्हणजे जेव्हा सुनेत्रा पवार यांना आपल्या पतीच्या दुर्घटनेची माहिती मिळाली.

Add Zee News as a Preferred Source

सकाळी 8.46 ला झाला अपघात 

अजित पवार यांचे विमान सकाळी 8.50  वाजता बारामती विमानतळावर उतरणार होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यालयीन कर्मचारी आधीच उपस्थित होते. सकाळी 8.46 वाजता विमान नियंत्रणाबाहेर पडताना कर्मचाऱ्यांनी पाहिले. कर्मचारी तातडीने रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी पोहोचले, परंतु या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.

सुनेत्रा पवारांना वाटलं की, 

सुनेत्रा पवार यांना फोन करुन या घटनेची माहिती देण्यात आली. तेव्हा सुरुवातीला त्यांना वाटलं की, कुणीतरी ही घाणेरडी मस्करी करत आहे. त्यांना सुरुवातीला या बातमीवर विश्वासच बसला नाही. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सुनेत्रा पवार यांना व्हिडीओ कॉल केला. जेव्हा सुनेत्रा पवार यांनी बारामती विमानतळाजवळ व्हिडिओ कॉलद्वारे विमानाचे जळते अवशेष पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हे दृश्य पाहून त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. घटनेच्या वेळी त्या दिल्लीत होत्या आणि लगेच बारामतीला निघून गेल्या.

दिल्लीहून तातडीने निघाल्या 

जेव्हा ही घटना घडली तेव्हा सुनेत्रा पवार या दिल्लीत होत्या. त्या तातडीने दिल्लीहून सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारसोबत तातडीने निघाल्या. पवार कुटूंब, कार्यकर्ते आणि संपूर्ण देशासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. 

राजकारण मोठा बदल 

या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रात जलद राजकीय बदल घडून आले. 31  जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये, 2 फेब्रुवारी रोजी त्या फलटण तालुक्यातील तरडेगाव येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी गेल्या.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp