digital products downloads

शरद पवार 15 वर्षांनी अजित पवारांच्या निवासस्थानी गेले: विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनेत्रांची भेट – Mumbai News

शरद पवार 15 वर्षांनी अजित पवारांच्या निवासस्थानी गेले:  विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनेत्रांची भेट – Mumbai News



शरद पवार बुधवारी सायंकाळी पत्नी प्रतिभा यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सांत्वनासाठी अजित पवारांच्या बारामती येथील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी गेले. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा वाद सुरू असताना १५ वर्षांनंतर पवार सहयोग सोसायटीत गेले. सूत्रांनी सांगितले की, पवारांनी विलीनीकरणाविषयी सुनेत्रांसोबत कोणतीही चर्चा केली नाही. तत्पूर्वी बुधवारी सकाळी पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. विलीनीकरण बैठकीला उपस्थित नसलेल्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार काय? असे ते म्हणाले. त्यानंतर पार्थ पवार शरद पवारांना भेटले. पवार कुटुंबीयांच्या मालकीच्या विविध संस्थांमध्ये अजित पवारांच्या जागी वाटा-हिस्सा तसेच नियुक्तीबद्दल त्यांनी चर्चा केली असे उर्वरित. स्पोर्ट््स पवारांनी विलीनीकरणावर एक शब्दही न बोलता केली असावी विलीनीकरणाची पायाभरणी गेल्या तीन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरून वाद वाढत चालला आहे. त्यातच सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाविषयी मला काहीही माहिती नाही, अजित पवारांच्या स्मारक उभारणीविषयी मला काहीही कल्पना नाही, अशी वक्तव्ये शरद पवारांनी केली. त्यामुळे कौटुंबिक तणावही वाढू शकतो, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर सारवासारव करण्यासाठी शरद पवार मुद्दाम पत्नी प्रतिभा यांना घेऊन सुनेत्रांच्या भेटीला गेले असावेत. तेथे त्यांनी अजित पवारांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देऊन सुनेत्रांशी भावनिक संवाद साधला असावा. विलीनीकरणाविषयी एक शब्दही न बोलता विलीनीकरणाची पायाभरणी त्यांनी केली असावी, असे दिसते. अजित पवारांच्या पीएची सीआयडीने केली चौकशी धवारी पुणे सीआयडी पथकाने थेट मंत्रालयात धडक देत अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची ४ तास चौकशी केली. दरम्यान, आ. मिटकरी म्हणाले की, विमान कोसळण्यापूर्वी एका व्यक्तीने बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी सांगितले. ही दोन वक्तव्ये सांगतात संघर्षाची तीव्रता आधी कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण याचे उत्तर द्या – तटकरे
आमच्या तीन अटी मान्य केल्या तरच विलीनीकरण शक्य -माजी मंत्री अत्राम
सायंकाळी ६.३० वाजता : शरद पवार, प्रतिभा पवार गेले सुनेत्रा पवारांच्या भेटीला
दुपारी १.३० वाजता : अजित पवारांच्या स्मारकाबद्दल मला माहिती नाही- शरद पवार
सकाळी ११ वाजता : सुनील तटकरेंचे शरद पवारांवर अप्रत्यक्ष शरसंधान
दुपारी १ वाजता : पार्थ पवार, जय पवारांकडून स्मारकासाठी जागेची पाहणी
सकाळी ९ वाजता : विलीनीकरणाबाबत शरद पवारांची फडणवीसांवर टीका

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp