digital products downloads

Mumbai-Pune Expressway बांधायला किती खर्च आला? आज बांधल्यास किती पैसे लागतील? A To Z इतिहास

Mumbai-Pune Expressway बांधायला किती खर्च आला? आज बांधल्यास किती पैसे लागतील? A To Z इतिहास

Mumbai Pune Expressway Interesting Facts History Total Cost: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सध्या वाहतुककोंडीमुळे प्रचंड चर्चेत आहे. एका गॅस टँकरचा अपघात झाल्याने महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला हा मार्ग 32 तासांनी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या मार्गावर 62 किलोमीटरहून अधिक दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकदा विकेण्डलाही वाहतुककोंडीमुळेच चर्चेत राहणाऱ्या या महामार्गाचं खरं नाव अनेक मुंबईकरांना तसेच पुणेकरांना ठाऊक नाही. बरं हा एक्सप्रेसवे कधी? कोणी? कसा बांधला? तो बांधण्यासाठी किती खर्च आला हे माहितीये का? आज हा एक्सप्रेसवे बांधायचं ठरलं असतं तर किती रुपये लागले असते माहितीये का? याबद्दलच जाणून घेऊयात…

Add Zee News as a Preferred Source

अधिकृत नाव काय?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे अधिकृत नाव म्हणजेच सरकार दरबारी नोंद असलेलं नाव यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे असं आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा अनेक अर्थांनी खास आहे. हा भारतातील पहिला 6-मार्गिका (लेन) असलेला काँक्रीटचा, एन्ट्री रेग्युलेटेड टोलनाका असलेला द्रुतगती मार्ग आहे. हा 94.5 किलोमीटर लांबीचा मार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची चक्र फिरवणाऱ्या मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडतो. 

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे कोणी बांधला?

हा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच ‘एमएसआरडीसी’ने बांधला. 1997 साली मार्च महिन्यामध्ये ‘एमएसआरडीसी’ला बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (बीओटी) तत्वावर हा प्रकल्प देण्यात आला. या करारानुसार 30 वर्षांसाठी या मार्गावर टोल गोळा करण्याची परवानगी होती. जानेवारी 1997 मध्ये खाजगी कंत्राटदारांना ज्यामध्ये चार मुख्य कंत्राटदार आणि इतर उप-कंत्राटदारांना हे काम देण्यात आले. सप्टेंबर 1998 मध्ये म्हणजेच दीड वर्षांनी खंडाळा आणि लोणावळा-खंडाळा बायपास भागातील विस्तारासाठी ‘एमएसआरडीसी’कडून अतिरिक्त कंत्राटे देण्यात आली. 

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे कधी बांधला?

1990 मध्ये रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस म्हणजेच ‘आरआयटीईएस’ने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधण्याआगोदरचं सर्वेक्षण आणि अभ्यास केला. तब्बल चार वर्षांनी म्हणजेच 1994 मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या प्रकल्पासंदर्भात आराखडा आणि अहवाल सादर करण्यात आला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी पर्यावरण आणि वन मंजुरी ऑक्टोबर-नोव्हेंबर 1997 मध्ये मिळाली. प्रत्यक्ष बांधकामाला 1998 मध्ये सुरूवात झाली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा पहिला टप्पा सन 2000 मध्ये सुरु करण्यात आला आणि संपूर्ण मार्ग एप्रिल 2002 मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाला. 

सुरुवातीला किती मार्गिका (लेन्स) होत्या आणि त्या कधी वाढवण्यात आल्या?

सुरुवातीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रत्येक दिशेला तीन याप्रमाणे एकूण 6 मार्गिका होत्या. 1998 मध्ये खंडाळा आणि लोणावळा-खंडाळा बायपास भागात प्राथमिक विस्तार करण्यात आला.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी किती खर्च आला? आता बांधला तर किती खर्च येईल?

1994 मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठीचा अंदाजित खर्च 11.46 अब्ज रुपये म्हणजेच 140 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका होता. प्रत्यक्षात हा खर्च 16.3 अब्ज रुपये म्हणजेच 190 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला. आज मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधायचा झाला आणि त्यावेळी खर्च करण्यात आलेल्या रक्कमेचं मागील 2002 ते 2026 मधील वाढत्या महागाईच्या तुलनेत मूल्य तपासून पाहिलं म्हणजेच एन्फ्लेशनचा दर जोडून पाहिला तर 4,28,01,54,65,480 इतके रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच आज मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधला तर 42 हजार 801 कोटी रुपयांहून अधिक खर्च येईल.

पर्याय उभा राहणार

आता हा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सुद्धा अपुरा पडू लागला असल्याने मार्च 2019 पासून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलं आहे. यात काही भागात प्रत्येक दिशेला 3 वरून 4 मार्गिका (एकूण 8 मार्गिका) करण्यात आल्या. मिसिंग लिंकचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp