digital products downloads

पार्थ पवारांकडे NCP चे अध्यक्षपद? शरद पवार आग्रही; पण NCP आमदार, खासदारांना ‘या’ व्यक्तीला करायचंय अध्यक्ष

पार्थ पवारांकडे NCP चे अध्यक्षपद? शरद पवार आग्रही; पण NCP आमदार, खासदारांना ‘या’ व्यक्तीला करायचंय अध्यक्ष

NCP National President:  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे. 30 जानेवारी रोजी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनंतर कोण या प्रश्नाला सरकारच्या लेखी जरी सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून उत्तर मिळालं असलं तरी पक्षाला अद्याप अध्यक्ष प्राप्त झालेला नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कारभाराचा गाडा हाकत असताना स्वत:च्या पक्षाचे अध्यक्षही होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर पक्षासाठी फार महत्त्वाची असलेली ही पोस्ट कोणाकडे सोपवायची यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. सुरुवातीला सुनील तटकरेंपासून ते अगदी प्रफुल्ल पटेलांपर्यंतच्या नावाचीही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र नंतर अनेकांनी हे पद पवार कुटुंबाकडेच राहील असं सांगितलं. मात्र आता पवार कुटुंबामध्ये हे पद कोणाला द्यायचं यावरुन कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या शरद पवारांचं मत आणि पक्षाच्या नेत्यांचं मत वेगळं असून यावरुन वादाला तोंड फुटू शकतं. 

Add Zee News as a Preferred Source

पवार कुटुंब आलं एकत्र

अजित पवार यांच्या अपघाती निधनाला शुक्रवारी 10 दिवस पूर्ण झाले. अजित पवारांचा दशक्रियाविधी खासगीमध्ये करण्यात आला. तसेच कालचाच दिवस हा सांत्वन भेटीचा हा शेवटचा दिवस होता. त्यामुळेच सायंकाळी शरद पवार बारामतीतील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी दाखल झाले होते. परवा आणि काल शरद पवार उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी दाखल झाले होते. आज देखील तिसऱ्या दिवशी शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. आज सांत्वन भेटीचा हा शेवटचा दिवस आहे. पवार कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. बारामतीतील सहयोग निवासस्थानी स्वतः शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार ,जय पवार, आमदार रोहित पवार, त्यांचे   वडील राजेंद्र पवार, रणजीत पवार, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांसह पवार कुटुंबीय उपस्थित होते. 

नक्की पाहा हे फोटो >>> सुनेत्रा पवारांच्या बारामतीमधील घरातील ‘ते’ फोटो चर्चेत; दोन्ही NCP एकत्र येण्याचा मार्ग मोकळा?

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबद्दल चर्चा सुरु असतानाच खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांचं या विषयावर वेगवेगळं मत आहे. शरद पवारांनी पार्थ पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असावेत यासाठी आग्रही आहेत. गेली तीन दिवस शरद पवार आणि पार्थची जवळीक देखील वाढताना दिसत आहे. गेली तीन दिवस शरद पवार आणि पार्थची जवळीक देखील वाढताना दिसत आहे. पुणे ऑफिस देखील पार्थ पवारांनीच बांधलं आहे. नरेश अरोरा यांना राजकीय सल्लागार म्हणून नेमण्याचा निर्णय देखील पार्थ पवारांचाच आहे. 

मात्र दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार मात्र सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्विकारावं यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. आता या मतभेदांवर कसा तोडला काढला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp