digital products downloads

मुंबईला गुजरातशी जोडणाऱ्या रस्त्यावर सापडले 13 कोटी 80 लाखांचे ड्रग्ज; कुर्ल्यातील एकाला अटक

मुंबईला गुजरातशी जोडणाऱ्या रस्त्यावर सापडले 13 कोटी 80 लाखांचे ड्रग्ज; कुर्ल्यातील एकाला अटक

Narcotics Syndicate Near Mumbai: ठाणे पोलिसांनी ड्रग्जचं एक मोठं रॅकेट उद्धवस्त केलं आहे. ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली. या कारवाया खंडणी विरोधी पथक आणि अमलीपदार्थ विरोधी पथकाने केल्या आहेत. मागील काही काळात शहरांमध्ये ताब्यात घेण्यात आलेला हा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा ठरला आहे.

Add Zee News as a Preferred Source

घोडबंदर रोडवरही कारवाई

ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 13 कोटी 80 लाखांचे हेरॉइन ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. 1 फेब्रुवारी रोजी गायमुख, मुंबईला गुजरातशी जोडणाऱ्या मुख्य मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदर रोड परिसरात सापळा रचून नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 50 वर्षीय फरदीन गुलजार मुल्ला याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून सहा कोटी 86 लाखांचे दोन किलो 288 ग्रॅम वजनाचे हेरॉइन जप्त केले. 

सहा कोटी 94 लाख 40 हजारांचे हेरॉइन

दरम्यान, 23 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तलत सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा कोटी 94 लाख 40 हजारांचे हेरॉइन हस्तगत केले. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे साथीदार मोहंमद खान महाडिक (67, रा. कुर्ला) यालाही 26 जानेवारी रोजी अटक केली.

टोळीचा पर्दाफाश

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, सोमनाथ पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र निकम, दीपक डुम्मलवाड, मोहन परब आणि हवालदार देसाई यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला.

इतरही अनेक ठिकाणी छापेमारी

या कारवाईशिवाय फेब्रुवारी 2026 च्या सुरुवातीला ठाणे शहर पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेल (एएनसी) आणि क्राइम ब्रँचने विविध भागांत छापे टाकून मोठ्या प्रमाणात हेरॉइन, मेप्हेड्रोन (एमडी), गांजा आणि अवैध कफ सिरप जप्त केले. हे ऑपरेशन्स अंतरराज्यीय ड्रग तस्करी नेटवर्कशी जोडलेले आहेत, आणि त्यात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने दिवा पूर्व भागात छापा टाकून सहा लाख रुपये किंमतीचा 24.2 किलो गांजा जप्त केला आणि तीन आरोपींना अटक केली.हे आरोपी अंतरराज्यीय ड्रग तस्करी सिंडिकेटचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. ठाणे शहर पोलिसांच्या एएनसीने दिवा येथील ह्युमॅनिटी पब्लिक स्कूलजवळ ट्रॅप रचून दोन आरोपींना अटक केली. या आरोपींकडे 7 कोटी रुपये किंमतीचं 1.736 किलो हेरॉइन जप्त केलं. हे ड्रग एका कुप्रसिद्ध गँगस्टरशी जोडलेले असून तो 22 वर्षांपासून फरार होता. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp