
Maharashtra ZP Election 2026 : मतदान म्हणजे पोरखेळ नाही. बाळ हट्ट पूर्ण करण्याचा खेळ ही नाही मात्र संभाजीनगरच्या पाचोडमध्ये असे काहीसं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेचे आमदार विलास भुमरे हे आपल्या कुटुंबासह मतदानाला गेले होते. सोबत त्यांची लहान मूलं ही होती. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जातानाही भुमरे हे आपल्या मुलांना आत थेट ईव्हिएमपर्यंत घेऊन गेले. एवढंच नाही तर मतदानानंतर आमदार विलास भुमरे यांच्या बोटाला मतदान अधिकाऱ्याने शाई लावली. 8 वर्षाच्या मुलाने EVM चे बटन दाबून मतदान केले आहे.
भुमरेंनी मुलाला सोबत घेऊन बटण दाबलं
भुमरेंच्या मुलानेही शाई लावण्याचा हट्ट धरला. आता आमदाराचा मुलगा म्हणून मतदान अधिकाऱ्याने ही बाळ हट्ट पूर्ण करत मुलाच्या बोटाला शाई लावली. याचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरू झाली. या झाल्याप्रकारानंतर आमदार आणि मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाचा पोरखेळ केल्याची टीका होऊ लागली. मात्र आमदार विलास भुमरेंना यात काही वावगं वाटतं नाहीय. या प्रकारात कोणत्याही प्रकारच्या नियमांची पायमल्ली झाली नसल्याचं आमगदार भुमरेंचं म्हणणंय. तर दुसरीकडे आमदार विलास भुमरेंचे वडिल आणि संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमेर यांनी आपल्याला काही माहित नसल्याचं म्हणत कानावर हात ठेवलेत.
आमदार विलास भुमरेंवर कारवाई होणार?
आमदार विलास भुमरे यांनी मात्र या प्रकाराची पाठराखण केली, माझा छोटा मुलगा माझ्या सोबत आला मुलाने हट्ट केला म्हणून अधिकाऱ्याने शाई लावली, मुलगा येणे गैर नाही, मुलाचा हट्ट मी पूर्ण केला तिथं नियमांची पायमल्ली झाली नाही असे स्पष्टीकरण विलास भूमरे यांनी दिलाय. याबाबत आता कारवाई होईल. मात्र ती फक्त मतदान अधिकाऱ्यांवर होईल असे चित्र दिसतंय, मात्र नियम मोडून मुलाला नेणाऱ्या आमदारांचे काय असा प्रश्न आहे, निवडणूक ही पोरखेळ नाही हे आमदारांनी समजून घेणे गरजेचे आहे.
दोषी कर्मचा-यांवरही कारवाई होणार
जिल्हाधिका-यांनी भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात घेऊन गेल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला दिली. याप्रकरणी आयोगानं पाचोड येथील मतदान केंद्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले. चौकशी झाल्यानंतर जो कोणी कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिलीय.
अल्पवयीन मुलाने मतदान यंत्रातले बटन दाबून मतदान केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर मधील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान यंत्रातले बटन दाबून मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अशावेळी 18 पेक्षा कमी लहान मुलांना प्रवेश देणे संयुक्तिक नाही त्या मतदार केंद्र अधिकारी आणि पोलिसांनी मज्जाव केला पाहिजे होता. त्यांच्याकडून असं अपेक्षित नाही याबाबत निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर मधील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान यंत्रातले बटन दाबून मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशावेळी 18 पेक्षा कमी लहान मुलांना प्रवेश देणे संयुक्तिक नाही त्या मतदार केंद्र अधिकारी आणि पोलिसांनी मज्जाव केला पाहिजे होता. त्यांच्याकडून असं अपेक्षित नाही याबाबत निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



