
- Marathi News
- National
- Over 200 Nepalese Kidneys Sold In India Every Year; This Racket Is Run From New Delhi, Network In 4 Districts Of Nepal, 100 Victims From A Single Village In 10 Years
अजय प्रकाश44 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
होक्षे हे गाव नेपाळची राजधानी काठमांडूपासून ४० किमीवर, पंचखाल पोलिस स्टेशनपासून फक्त ३ किमी अंतरावर लष्करी छावणीला लागून आहे. संपूर्ण नेपाळमध्ये ते “किडनी व्हिलेज” म्हणून ओळखले जाते. कारण येथील १०० हून अधिक तरुणांनी भारतात त्यांच्या किडन्या विकल्या आहेत. नेपाळी पोलिसांनी रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांना तुरुंगात टाकले आहे. तरीही हा व्यापार संपवण्याऐवजी कावरे, सिंधुली, सिंधुपालचौक, स्यांगजा आणि काठमांडू जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. आता भारतीय तस्कर ते चालवत आहेत. ते त्यांच्या एजंट्सद्वारे येथे थेट पीडितांना शोधतात आणि त्यांना नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता येथे आणतात, जिथे ते त्यांची किडनी ४ ते ५ लाख रुपयांना विकतात.
भास्कर टीमने नेपाळच्या या जिल्ह्यांना भेट दिली. सुमारे २० पीडितांशी बोललो. काठमांडू न्यायालयात दाखल पहिल्या आरोपपत्राची तपासणी केली असता किडनी रॅकेटचे दुवे नवी दिल्लीशी असल्याचे आढळून आले. चौकशी अधिकारी, नेपाळच्या मानवी तस्करी प्रतिबंधक ब्युरोचे प्रमुख एसएसपी कृष्ण प्रसाद पंजेनी म्हणतात, दरवर्षी २०० नेपाळींना किडनीसाठी भारतात आणले जाते.
नेपाळमध्ये किडनी तस्करी हा गुन्हा आहे. त्यामुळे किडनी तस्कर व पीडितांबद्दल माहिती मिळत नव्हती. तथापि, ५ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक ब्लॉगरने सिंधुलीतील पीडिताबद्दल पोस्ट केली, ज्यात पीडिताने त्याला दिल्लीला कसे नेले, त्याची किडनी कशी काढली याचे वर्णन केले. यानंतर आम्ही इन्स्पेक्टर रुद्र भट्ट यांच्या नेतृत्वात पथक भारतात पाठवले. ३ महिन्यांत आम्ही रॅकेटचा पर्दाफाश करत २ नेपाळी तस्कर, मास्टरमाइंड श्याम भंडारी, सुजन गिरीसह ६ जणांना अटक केली.
किडनी तस्कराने भास्करला सांगितले… घाबरत नाही
भास्कर टीम किडनी तस्कर रुम्मनशी बोलली तेव्हा तिने सांगितले की दिल्लीत एक दाता सापडेल. सर्व काही २५ ते ३० दिवसांत केले जाईल. खर्च ४० लाख रु. असेल. सर्व प्रक्रिया कायदेशीर असेल. काळजीची गरज नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये २- ३ रुग्णालये आहेत. कोलकाता येथे कामाला उशीर होतो. तुम्ही पैशांची व्यवस्था करा, बाकीचे आम्ही करू.
आधी रेकी, नंतर तात्पुरती नोकरी, ६ महिन्यांनी माघारी
श्याम आणि सुजन प्रथम गावाची रेकी करायचे आणि २५ ते ४० वयोगटातील व्यक्तींना लक्ष्य करायचे. नंतर त्यांना भारतात हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने ते त्यांना नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथे विमानाने पाठवायचे. येथे नेपाळी तस्कर त्यांना हाताळायचे व त्यांच्या किडन्या काढून नंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना नेपाळला परत पाठवायचे.
काठमांडूच्या आरोपपत्रात नवी दिल्ली-कोलकाता रुग्णालयांची नावे
- या प्रकरणातील आरोपपत्र गतवर्षी डिसेंबरमध्ये दाखल करण्यात आले होते. निरीक्षक रुद्र भट्ट यांच्या मते, ३८ वर्षीय भंडारी हा सिंधुपाल चौक जिल्ह्यातील आहे. भंडारी व गिरी यांनी सांगितले की ते दिल्लीत राहणारे रुम्मन कासिम, अरविंद बंगाली, आनंद यादव यांच्या संपर्कात होते. हे तिघे आता भारत, नेपाळ व बांगलादेशातून रॅकेट चालवत आहेत. बंगालची रहिवासी रुम्मन ही आता भारतातील रॅकेटची मुख्य सूत्रधार आहे.
- श्यामची २०२३ मध्ये नोएडातील यथार्थ हॉस्पिटलमध्ये रुम्मन व आनंदशी भेट झाली, जिथे रुम्मन काम करत होती. आरोपपत्रात यथार्थ व्यतिरिक्त कोलकातामधील दोन रुग्णालयांची नावेदेखील आहेत: क्वाड्रा मेडिकल सर्व्हिसेस आणि रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट. सर्व चाचण्या दिल्लीतील टिळकनगर येथील लॅबमध्ये केल्या जातात.
- श्यामने लाजपतनगरमध्ये O18, O7 आणि G7 भाड्याने घेतले होते. तो दिल्लीतील पहाडगंज येथील ऋषी गेस्ट हाऊसमध्ये राहत होता. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर पीडितांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.
- नेपाळ पोलिसांनुसार, ६ पैकी ५ नेपाळी तस्करांच्या किडन्याही त्याच पद्धतीने काढण्यात आल्या. प्रकरणातील सर्व पीडित दलित आहेत.
- एकट्या सुजन गिरीने २५ नेपाळी नागरिकांना त्यांच्या किडन्या विकण्यासाठी भारतात आणले आहे. पैकी १६ किडन्या विकल्या गेल्या आहेत.
प्रत्येकाचा दर निश्चित आहे
एकूण खर्च : ३५ ते ४० लाख रेकी खर्च : ५ ते ७ हजार बॉर्डर ते नवी दिल्लीपर्यंत : १ ते १.५ लाख ६ महिन्यांचा खर्च : २ लाख मूत्रपिंड दान करणाऱ्या व्यक्तीला फक्त ४-५ लाख मिळतील, तर रॅकेटर्स २५ लाख ठेवतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



