
Sindhudurg ZP Election Result: राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून, भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. 2017 चा विक्रम भाजपाने मोडला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी नेत्यांनी आपला बालेकिल्ला राखला आहे. तर अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. महायुतीने अनेक ठिकाणी मैदान मारलं असून, सिंधुदुर्गात एकहाती सत्ता आली आहे.
सिंधुदुर्गात महायुतीची एकहाती सत्ता आली आहे. मागील 27 वर्षं नारायण राणे यांच्या विचाराचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसत असून, राणेंनी गड राखला आहे. तळकोकणात भाजपा कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सुरु आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आपला गड राखण्यात अपयशी ठरले आहेत. वैभव नाईक यांच्यासाठी ही आतित्वाची लढाई होती.
नितेश राणे यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, “कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत 100 टक्के सत्ता महायुतीची आहे. म्हणून उबाठा आणि महाविकास आघाडीला तोंडावर आपटणे काय असते? धूळ चारणे काय असते? हे बघायचे असेल तर सिंधुदुर्गाचे निकाल पाहायला पाहिजेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सबकुच देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला यश मिळाले”.
विरोधकांकडून कोकणातील निकाल नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यापुरता असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर ते म्हणाले, “मग, ते कोणत्या पक्षाचे आहेत? भाजप-शिवसेनेचे आहेत. त्यांच्याकडे कुठे 100 लोक आहेत? त्यांच्याकडे एकच उद्भव ठाकरे, राज ठाकरे, राहुल गांधी आहेत. लोकांचा विश्वास महाविकास आघाडीवरून उडालेला आहे. हे लोकसभेपासून जिल्हा परिषदपर्यंत वारंवार दिसतेय. पुढील 5वर्षांसाठी सिंधुदुर्गचा विकास करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत”.
कणकवली तालुका
१) वरवडे – सोनू सावंत (भाजप)
२) नांदगाव – हर्षदा वाळके (भाजप)
३) जाणवली – महेश्वरी चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी – संजना राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक – दिव्या पेडणेकर (भाजप)
६) नाटळ – सायली कृपाळ (भाजप)
देवगड तालुका
७) पडेल – अंकुश ठूकरूल (भाजप)
८) नाडण – गणेश राणे (भाजप)
९) बापर्डे – संजना लाड (भाजप)
१०) फणसगाव – समृद्धी चव्हाण (भाजप)
११) शिरगाव – शितल तावडे (भाजप)
१२) कोटकामते – ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी
१३) कोकिसरे – साधना नकाशे (भाजप)
वेंगुर्ले
१४) आसोली – संकेत धुरी (भाजप)
१५) म्हापण – विष्णू फणसेकर (भाजप)
मालवण
१६) आडवली मालडी – सीमा परुळेकर (भाजप)
१७) आचरा – दिपक सुर्वे (भाजप)
सावंतवाडी
१८) शेर्ले – महेश धुरी (भाजप)
१९) विलवडे – प्रशांत सुकी (भाजप)
२०) माडखोल – प्रथमेश सावंत (अपक्ष)
२१) शिरवंडे – दीपक चव्हाण (शिवसेना)
२२) आंबोली – मायकल डिसोझा (शिवसेना)
दोडामार्ग
२३) कोलझर – गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)
२४) राजेश जाधव (भाजप)
२५) खारेपाटण, कणकवली – गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना शिंदे गट)
२६) देवगड मुणगे – सदाशिव ओगले (भाजप)
२७) देवगड तळवडे – सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे गट)
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



