digital products downloads

शरद पवार ICU मध्ये दाखल? डॉक्टरांनी केलं स्पष्ट, ‘मागील दोन-तीन दिवसांपासून…’, सुप्रिया सुळेंचं WhatsApp स्टेटस चर्चेत

शरद पवार ICU मध्ये दाखल? डॉक्टरांनी केलं स्पष्ट, ‘मागील दोन-तीन दिवसांपासून…’, सुप्रिया सुळेंचं WhatsApp स्टेटस चर्चेत

Sharad Pawar Admitted in Hospital of Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील रुबी रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान शरद पवारांना नेमकं काय झालं आहे याची माहिती रुग्णालयातील डॉक्टर अभिजीत लोढा यांनी दिली आहे. तसंच रोहित पवार यांनी पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक यांना रुग्णालयात गर्दी न करण्याची विनंती केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

डॉक्टरांनी काय सांगितलं?

डॉक्टर अभिजीत लोढा रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, “त्यांना कफ झाला आहे. काही दिवसांपासून शरद पवार यांना हा त्रास जाणवत असावा. शारीरिक परिश्रम झाल्यामुळे त्यांना काहीसा थकवा जाणवत होता आणि खोकला सुद्धा होता. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांना त्रास असावा. ऑक्सिजन, ब्लड प्रेशर, सॅच्यूरेशन सर्व काही नॉर्मल आहे. आता सर्व स्थिर आहे. काळजी करण्यासारखं काही नाही”. यावेळी त्यांनी शरद पवार आयसीयूत नसून, रुममध्ये आहेत असं स्पष्ट केलं आहे. 

आम्ही उपचार सुरु केले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचारासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना व्हेटिंलेटर लावण्यात आलेला नाही. दोन, तीन दिवसांत रिपोर्ट मिळेल असं ते म्हणाले आहेत. 

दरम्यान रोहित पवारांनी यावेळी म्हटलं की, “मी कार्यकर्त्यांना हॉस्पिटलला येऊ नका अशी विनंती करतो. येथे इतरही रुग्ण आहेत. पवारांची तब्येत नॉर्मल आहे. ते आयसीयूत नसून एका खासगी रुममध्ये आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करुन आलो आहे. घाबरण्यासारखं काही नाही”. 

पुढे त्यांनी म्हटलं की, “मागील 12-13 दिवसांपासून ते लोकांना भेटत होते, दौरा करत होते त्यामुळे शारिरीक तणाव आला असावा. त्यांना कफ झाला आहे. पुढच्या काही वेळात रिपोर्ट येतील. माझ्या माहितीप्रमाणे एखाद दोन दिवस त्यांना रुग्णालयात ठेवलं जाईल. नंतर खासगी गाडीने मुंबईला नेलं जाईल. इतर पेशंटच्या हितासाठी गर्दी करु नये. त्यांना कोणालाही भेटता येणार नाही. सर्वांना रुग्णालयाचा प्रोटोकॉल पाळावा असं आमच्या सर्वांचं म्हणणं आहे”.

सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस

दरम्यान सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांना काय झालं आहे याची माहिती दिली आहे. शरद पवार यांना छातीत कंजेशन झालं असून, पाच दिवस अँटिबायोटिक्स दिले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं सुप्रिया सुळे यांनी  स्पष्ट केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

शरद पवार ICU मध्ये दाखल? डॉक्टरांनी केलं स्पष्ट, 'मागील दोन-तीन दिवसांपासून...', सुप्रिया सुळेंचं WhatsApp स्टेटस चर्चेत

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार सगळे उपचार पार पडतील असं त्यांनी स्पष्ट केलं असून, कोणालाही भेटायला सोडू नका. तुमच्या हॉस्पिटलचे सगळे नियम पाळा असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp