digital products downloads

कोपायलटचा ‘ओह शिट’ आवाज आला तेव्हा मुख्य पायलट शांत का होता? रोहित पवारांनी उपस्थित केली गंभीर शंका!

कोपायलटचा ‘ओह शिट’ आवाज आला तेव्हा मुख्य पायलट शांत का होता? रोहित पवारांनी उपस्थित केली गंभीर शंका!

Rohit Pawar On Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी हे सातत्याने व्यक्त करत आहेत. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत घातपाताचा संशय व्यक्त केला. हे स्पष्ट करताना रोहित पवारांनी अनेक मुद्दे मांडले. त्यातील पायलटच्या संभाषणातील मुद्दा रोहित पवारांनी मांडला. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कुठेच सुरू नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या काकासाठी आज बोलावे लागतय. 24 तारखेला दादांना वाटले की आता खूप उशीर झाला म्हणून ते गाडीने न जाता विमानाने गेले. हा घातपात आहे का? दादा गाडीने बारामतीला जाणार होते मग ते का गेले नाहीत? एक मोठा नेता दादाला भेटायला येणार होता तो उशिरा आणि आणि चर्चा उशिरापर्यंत सुरूच राहिली. 
आणि त्यामुळे दादांना विमानाने प्रवास करावा लागला. एक मोठा नेता दादांना बोलला एका फाइलवर काहीही करून  सही करावी लागेल. फाइल येईपर्यंत दादा थांबले आणि दादांना उशीर झाल्याचे रोहित पवारांनी सांगितले. 

28 तारखेला विमानाची नियोजित वेळ सकाळी 7 वाजताची होती. मग विमान 8.10 ला का निघाले? दादा कधीच उशिरा पोहोचताच नाही. मग विमानाची वेळ का बदलण्यात आली? दादा कधीच रिस्क घ्यायचे नाही. साहिल मदन आणि को. पायलट यश याना एनवेळी का बदलण्यात आले? सकाळी 7 वाजता पूर्ण क्रू विमानतळवर पोहोचले होते. आधीचे पायलट वाहतूक कोंडीत अडकले होते याचे CCTV फुटेज आहेत का? असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. हे दोन्ही पायलट कोणत्या मार्गाने येत होते?  पण नंतर हे पायलट आले ते ड्रींक करुन आले होते का? असा प्रश्न त्यांनी विचारला. आमच्या मनात शंका आहे म्हणून आम्ही हे प्रश्न विचारतोय. तुम्ही तुमचा माणूस गमावला आम्ही आमचा. आम्ही मागील १३ दिवसापासून झोपलो नाही, असे रोहित पवारांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितले. 

पायलटेचे Breath test चे CCTV फुटेज देण्यात यावे, अशी मागणी रोहित पवारांनी केली. विमानाचा ट्रासनपोंडर एक मिनिट आधीच का बंद करण्यात आला? जर नसता बंद केला तर आपल्याला सगळी माहिती मिळाली असती.विमानाच्या लँडिंगसाठी रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली आणि नंतर 2 मिनिटांच्या आत रनवे 11 साठी परवानगी मागण्यात आली का? व्हिजिबीलीटी नसतानादेखील विमान उडवण्याची परवानगी का देण्यात अली? पायलटवर कोणी दबाव टाकत होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

कोपायलटचा आवाज oh shit, oh shit असा आवाज आला. सर्वसाधारणपणे मेडे मेडे असे बोलणे अपेक्षित असते. पण ती प्रतिक्रिया तात्काळ, उत्स्फूर्तपणे आली होती.  अचानक आपल्या समोर संकट आल्याची जाणिव कोपायलटला झाली होती. अशावेळी जो पायलट होता त्याचा आवाज का नाही आला? तो का शांत बसला होता? त्याला हे अपघात घडवून आणायचे होतं का? असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. तिथला रिस्पॉंडर 1 मिनिटं आधी बंद करण्यात आला होता. हे जाणिवपूर्वक करण्यात आले होते का? मुख्य पायलटची कोणतीच प्रतिक्रिया रेकॉर्ड कशी झाली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थि केला. हा अपघात नाही यात शंभर टक्के घात असू शकतो, असे रोहित पवार म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp