
Amol Mitkari On Ajit Pawar Death : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री फडणविस यांना अजित पवारांच्या अपघाताविषयी पत्र लिहिल आहे. विमान दुर्घटना ही अपघाती स्वरूपाची आहे की यामागे निष्काळजीपणा हे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी मिटकरींनी केली. याबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. या अपघातास जबाबदार असलेल्या दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं.
उच्च स्थरीय कमिटी गठीत करणे गरजेचे असल्याचे मिटकरी यांचे म्हणणे आहे. अजित दादा मृत्यू प्रकरणी चौकशी झाली पाहिजे अशा संदर्भातील पत्र मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. अजित दादा मृत्यू प्रकरणी एक दिवसीय अधिवेशन घेतले पाहिजे. नाहीतर येणाऱ्या अधिवेशनात एक दिवस अजित दादा मृत्यू प्रकरमाची चर्चा झाली पाहिजे. अजित दादा मृत्य प्रकरणी अनेक उत्तर मिळायची आहेत. आमच्या मनात संशय आहे. त्या सर्वांची उत्तरे जनते समोर आली पाहिजे असं अमोल मिटकरी म्हणाले.
अमोल मिटकरी यांच्या पत्रात काय आहे?
सदर विमान दुर्घटना ही अपघाती स्वरूपाची आहे की यामागे कोणताही मानवी दोष, निष्काळजीपणा अथवा अन्य कारणे आहेत का, तसेच या घटनेच्या अनुषंगाने व्यक्त होत असलेला घातपाताचा संभ्रम दूर होण्यासाठी सदर प्रकरणाची मा. न्यायमूर्ती सर्वोच्चन्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी होणे महत्त्वाचे असून याबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी प्रस्तावित करण्यात यावी. तसेच या अपघातास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेल्या दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी व तपासामध्ये सर्व शक्यता विचारात घेण्यात याव्यात.
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई.
विषय :
ना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे वावत.
महोदय,
उपरोक्त विषयान्वये आपले जवळचे स्नेही ना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूबाबत राज्यात तसेच जनतेमध्ये गंभीर स्वरूपाची चिंता व्यक्त होत आहे. सदर घटना अत्यंत गंभीर असून, त्यामागील कारणांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत.
सदर विमान दुर्घटना ही अपघाती स्वरूपाची आहे की यामागे कोणताही मानवी दोष, निष्काळजीपणा अथवा अन्य कारणे आहेत का, तसेच या घटनेच्या अनुषंगाने व्यक्त होत असलेला घातपाताचा संभ्रम दूर होण्यासाठी सदर प्रकरणाची मा. न्यायमूर्ती सर्वोच्चन्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी होणे महत्त्वाचे असून याबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी प्रस्तावित करण्यात यावी. तसेच या अपघातास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेल्या दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी व तपासामध्ये सर्व शक्यता विचारात घेण्यात याव्यात, आपण यापूर्वी C.I.D. चौकशी लावली त्यातून सत्य परिस्थीती बाहेर येईल याबद्दल दुमत नाही. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, ही विनंती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



