
Koshyari On Raj Thackeray: 8 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमावरुन सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली. भाजप नेत्यांकडून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंना चिमटा काढलाय. काय म्हणाले कोश्यारी? सविस्तर जाणून घेऊया.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या,” असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
नाशिकमध्ये कोरिडॉर
40 वर्षांपूर्वी देखील मी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे आलो होतो. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मीदेखील आज एक भक्त म्हणून आलोय. राज्यपाल असताना देखील मी नाशिकमध्ये आलो होतो. जसा अयोध्येत कॉरिडॉर झाला तसा इथे देखील झाला पाहिजे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हटल्याप्रमाणे ते सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. मी राज ठाकरेंचा खूप सन्मान करतो. मात्र मला वाटतं ते नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत. मोदींना घाबरू नका, त्यांच्याजवळ जा, असा सल्ला भगतसिंह कोश्यारींनी राज ठाकरेंना दिला. जसे प्रभू श्रीरामाला सर्व समान होते तसेच नरेंद्र मोदींना देखील सर्व समान आहेत. नरेंद्र मोदींना घाबरू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित तुम्ही आहात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
रोहित पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले?
अजित पवारांचा मृत्यू हा घातपाताचा असल्याचे रोहित पवारांनी म्हटले होते. यावरही कोश्यारी बोलले आहेत. अजित पवार एक मोठे नेते होते, मी अजित दादा यांना कधीच विसरणार नाही. त्यांचा मृत्यू घातपात वाटत असेल तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी, असे कोश्यारी म्हणाले.
‘मराठीला डिवचत गुजरातींना चोंबाळण्याचा प्रयत्न’
“मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत?” असा सवाल राज यांनी विचारला आहे. “मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?” असा सवालही राज यांनी विचारला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



