digital products downloads

नाशिक जिल्ह्यात 622 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज; निवडणुका सहा महिने लांबणीवर?

नाशिक जिल्ह्यात 622 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज; निवडणुका सहा महिने लांबणीवर?

विशाल मोरे मालेगाव, ( नाशिक )

Add Zee News as a Preferred Source

Grampanchayat Nashik District :  येत्या 15 फेब्रुवारी पासून नाशिक जिल्ह्यातील 622 गावातील ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार आहे. पेठ – सुरगाणा हे दोन तालुके वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात प्रशासक राज येणार आहे. तेव्हा एका प्रशासकावर अंदाजे 15 ते 20 गावांच्या विकासाची जबाबदारी येणार असल्याची शक्यता असल्याने गावाचा विकास कसा साधला जाणार हा मोठा प्रश्न आहे. 

आधीच जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्या यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यात आता 622 ग्रामपंचायत निवडणुका या सहा महिन्यानंतर घेण्यात याव्या अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आल्याचे डाबली गावाचे सरपंच यांनी सांगत आता माजी सरपंच यांना जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. 
एका पंचायत समितीला चार विस्तार अधिकारी असतात. एका विस्तार अधिकाऱ्याकडे 20 ते 25 गाव असतात त्यामुळे ते कोणकोणत्या गावाकडे लक्ष देणार आहेत आणि एका सरपंचाकडे एक गाव असते. भविष्यात उन्हाळा, चारा, पाणी टंचाई आहे. तेव्हा ज्यावेळी विधानसभा बरखास्त होते तेव्हा राज्याचा कारभार बघण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री हे काम बघतात तसेच प्रशासक ही संकल्पना रद्द करत सरपंच यांना देखील काळजीवाहू सरपंच म्हणून आदेश काढत निवडणुका होई पर्यंत कारभार बघू द्या अशी मागणी सचिन साळुंखे, नाळे येथील सरपंचांनी व्यक्त केली. 

गावांवर प्रशासक राज येणार मात्र याआधी जो विकास निधी मंजूर होता तो निधी बऱ्याच गावांवर अधिकारी नसल्यामुळे कामात घेता आला नाही. त्यातच निवडणुका लांबणीवर का टाकल्या याचे कारण शासनाने सांगावे. तेव्हा निवडणुका या प्रशासक राज लागल्यानंतर तत्काळ घ्याव्यात अशी मागणी सरपंच वीराने यांनी केली आहे. 

जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती कडून एक प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. पंचायत समितीचे आरोग्य, शिक्षण असे विविध विस्तार अधिकारी आहेत त्यांची आम्ही प्रशासक म्हणून नेमणूक करणार आहोत. जास्तीत जास्त प्रशासक कसे नेमले जाणार याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. तसेच अद्याप निवडणूक

आयोगाकडून वॉर्ड रचना, पुनर्निरीक्षण करणे या बाबत कुठलाच आदेश आला नसल्याचे गटविकास अधिकारी वेंदे यांनी सांगितले.  एकंदरीत सरपंचाकडून करण्यात आलेल्या काळजीवाहू सरपंच पदाची मागणी, तसेच लवकर ग्रामपंचायत निवडुकांचे कार्यक्रम घोषित करण्याची मागणी, प्रशासक ही संकल्पना रद्द करण्याची मागणी या सगळ्यांचा विचार आता सरकार कडून कसा करण्यात येईल हे बघणे महत्वाचे ठरेल.

नाशिक जिल्ह्यातील प्रशासक नियुक्त ग्रामपंचायती 

कळवण- 29 
येवला- 68 
इगतपुरी- 9
दिंडोरी- 30 
त्र्यंबकेश्वर- 3
सिन्नर- 100 
निफाड -65 
चांदवड- 53 
देवळा- 11
नांदगाव- 60
मालेगाव- 99 
नाशिक- 25 
एकूण- 622

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp