digital products downloads

Kolhapur Mumbai flight: 2 मार्चपासून सुरु होणार कोल्हापूर– मुंबई मार्गावर सकाळ-संध्याकाळ विमानसेवा!

Kolhapur Mumbai flight: 2 मार्चपासून सुरु होणार कोल्हापूर– मुंबई मार्गावर सकाळ-संध्याकाळ विमानसेवा!

Kolhapur Mumbai Flight Service: कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २ मार्चपासून कोल्हापूर–मुंबई या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही सत्रांत विमानसेवा उपलब्ध होणार आहे. सध्या फक्त सकाळची सेवा सुरू असून, प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे सायंकाळची फेरीही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यानंतर ही सेवा सुरू होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला आठवड्यातील दोन दिवस सायंकाळची सेवा उपलब्ध राहणार असून, पुढे ती दररोज सुरू करण्याचा मानस आहे.

Add Zee News as a Preferred Source

उड्डाणाचे वेळापत्रक कसं असेल?

पहिल्या टप्प्यात दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळची सेवा राहील.

  • सायं. ४.३० वाजता मुंबईहून विमान कोल्हापूरकडे प्रस्थान करेल.
  • सायं. ५.३५ वाजता कोल्हापूर येथे आगमन.
  • सायं. ६.०५ वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे उड्डाण.
  • सायं. ७.१० वाजता मुंबईत आगमन.

ही सेवा स्टार एअरवेजतर्फे दिली जाणार आहे. भविष्यात मुंबईहून उड्डाणाची वेळ आणखी उशिरा सायंकाळी ७ किंवा ७.३० नंतर—ठेवण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्यापारी आणि प्रवाशांसाठी दिलासा

सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा सेवा उपलब्ध झाल्याने व्यापारी, उद्योगपती तसेच वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. एका दिवसात मुंबईला जाऊन काम उरकून परत येणे अधिक सुलभ होईल.

कोल्हापूर विमानतळाची स्थिती

कोल्हापूर विमानतळावरून सध्या मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गांवर उड्डाणे सुरू आहेत. विमानतळाचा विस्तार सुरू असला तरी भौगोलिक परिस्थितीमुळे काही अडचणी कायम आहेत. सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात व टेकड्यांनी वेढलेल्या भागात विमानतळ असल्याने, विशेषतः पावसाळ्यात उड्डाण आणि अवतरणाबाबत मर्यादा येतात, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नमूद केले आहे.

कोल्हापूर विमानतळाबाबत सुरक्षा चिंता

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) कोल्हापूर विमानतळाला टेकड्यांनी वेढलेल्या भौगोलिक परिस्थितीमुळे विशेषतः पावसाळ्यात उड्डाण आणि लँडिंगसाठी काही प्रमाणात असुरक्षित ठरवले आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात, तसेच नद्या व तलावांच्या मध्यभागी हा लहान विमानतळ स्थित असल्याने हवामानातील बदलांचा परिणाम उड्डाणांवर होतो.

सध्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. धावपट्टी वाढवणे आणि इतर सुविधा सुधारण्याचे प्रयत्न शासन स्तरावर होत आहेत. मात्र, परिसरातील टेकड्या आणि नैसर्गिक अडथळे यामुळे पूर्ण सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना आणि मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

राज्य शासनाकडून धावपट्टी वाढवण्याचे काम सुरू आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, सुरक्षित उड्डाणासाठी परिसरातील अडथळे दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. काही विमानतज्ज्ञ सपाट आणि कमी अडथळ्यांची नवीन जागा विकसित करण्याचाही पर्याय सुचवतात.

तथापि, सध्याच्या घडीला सकाळ-संध्याकाळ अशी दुहेरी सेवा सुरू होणे हे कोल्हापूरच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp