digital products downloads

कवितासंग्र प्रकाशन सोहळा: प्रिया धारूरकर यांच्या चाहुलींचे अनवट नाद या कवितासंग्रहाचे 15 फेबुवारी रोजी प्रकाशन – Chhatrapati Sambhajinagar News

कवितासंग्र प्रकाशन सोहळा:  प्रिया धारूरकर यांच्या चाहुलींचे अनवट नाद या कवितासंग्रहाचे 15 फेबुवारी रोजी प्रकाशन – Chhatrapati Sambhajinagar News



कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या चाहुलींचे अनवट नाद या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार, 15 फेब्रुवारी रोज होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री प्रा. ललिता गादगे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कवयित्री प्रिया धारूरकर यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथील समर्थनगरमधील शासकीय ग्रंथालयाशेजारच्या गांधी भवनात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या आई मालती राघवेंद्र मुरुगकर यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पी. विठ्ठल यांचे भाष्य काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव आत्माराम जिगे उपस्थित राहणार आहेत. तर नांदेडच्या स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख आणि सुप्रसिद्ध कवी डॉ. पी. विठ्ठल या कवितासंग्रहावर भाष्य करतील. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन अक्षरसूक्त साहित्य मंडळ, मुक्तसृजन साहित्य संस्था, कैलास पब्लिकेशन आणि शताब्दी काव्य मंडळाने केले आहे. विदेही ते घन दाटले प्रिया धारूरकर यांचे विदेही, अंगभरून वाहणाऱ्या पान्ह्यातून हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचा घन दाटले स्वर हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे. पहिल्या दोन दशकांमधील मराठी कवितेतील स्त्री जाणिवांना समृद्ध करणाऱ्या त्या एक महत्त्वाच्या कवयित्री आहेत. तरल संवेदनांना चिंतनगर्भ आशय प्रदान करणारी त्यांची मांडणी लक्षणीय आहे. अनिवार आणि अलवार प्रेमातील समंजसपणा अंतिमतः माणूस म्हणून ‘स्व’ चा घेतलेला शोध आहे.स्त्री हे अभिव्यक्तीचे स्त्रोत असले, तरी त्यापुढे जाऊन मानवीमूल्य प्रस्थापित करणारी त्यांची कविता आहे. संबंधित वृत्त पाऊसवेळा VIDEO:आभाळ बरसत होतं, करुणा पांघरून, बुद्ध होऊन; आज प्रिया धारूरकर यांची कविता

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp