
NCP Merger: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अंकुश काकडे यांनी मोठा दावा केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र येणार होते, असा खुलासा काकडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय.त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.अंकुश काकडेंनी काय पोस्ट केलीय? त्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया आल्यात? सविस्तर जाणून घेऊया.
अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी राजकारण तापलंय.दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.त्यातच आता राष्ट्रवादी SPच्या अंकुश काकडे फेसबुक पोस्ट करत एक मोठा दावा केलाय.12 फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र येणार होते, असा खुलासा काकडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय.आज दादा तुम्ही हवे होतात. तुम्ही आज एक महत्त्वाचा निर्णय घेणार होतात. अशी पोस्ट अंकुश काकडेंनी केलीये.सोबतच दादा हयात असते तर आज राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असा ठाम विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही विलिनीकरणाबात प्रथमच मनातलं सगळं बोलून दाखवलंय.विलिनीकरणाबाबत अजितदादा आणि माझी चर्चा झाली होती असं स्पष्टपणे सांगून टाकलंय. दरम्यान शरद पवारांच्या पक्षाचे नेते सत्तेत येण्यासाठी अशा मनगढत गोष्टी पसरवत असल्याचा टोला परिणय फुके यांनी लगावलाय. तर दादांनी काही चर्चा केल्या असतील त्यात शंका घेणं चुकीचं असल्याचं सुनील शेळकेंनी म्हटलंय.
पवारांचे नेते अंकुश काकडेंच्या पोस्टमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.विरोधकांनी विलिनीकरण शक्य नसल्याचा दावा केलाय. मात्र दोन्ही राष्ट्रवादीतील अनेक नेते त्याबाबत सकारात्मक असल्याचं दिसतंय. त्यामुळे पुढील काही दिवसात विलिनीकरणाबाबत काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
संपूर्ण सूत्र पवार कुटुंबाकडे
ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विलीनीकरणाची संपूर्ण सूत्र पवार कुटुंबाकडे असल्याचं सूचक विधानामध्ये म्हटलं आहे. सुनेत्रा पवारांचा उल्लेख करत त्यांनी हे विधान केलं आहे. “सुनेत्रा पवारांनी जर विलीनीकरणासंदर्भात निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्य करावाच लागेल,” असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी हे विधान केलं. अजित पवारांबद्दलची सहानुभूमी मतपेटीतून दिसून येईल असं मुश्रीफ म्हणाले.
सुनेत्रा पवार यांची विलीनीकरणाबाबत भूमिका
विलीनीकरणासंदर्भात बोलताना हसन मुश्रीफ यांनी, “अजित पवारांच्या पातळीवर काही चर्चा सुरु असतील तर त्याची माहिती आम्हाला नाही. मात्र पवार कुटुंब आणि विशेषत: सुनेत्रा पवार यांची विलीनीकरणाबाबत भूमिका काय आहे, यावरच अंतिम निर्णय अवलंबून असेल. सुनेत्रा पवारांनी जर पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला तो स्वीकारावाच लागेल,” असं विधान केलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



