
Uddhav Thackeray on Zilha Parishad Panchayat Election Result: जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 7 फेब्रुवारीला 12 जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या 731 जागांपैकी भाजपाने 225 जागांवर विजय मिळवला. यानंत दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. 387 ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 162 ठिकाणी विजय मिळाला. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 731 पैकी फक्त 43 जागांवर विजय मिळाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
निवडणुकीत महायुतीकडून पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही यश मिळवलं आहे असं कौतुक त्यांनी केलं आहे. उरण आणि रायगड येथील विजयी उमेदवारांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केल
“अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही या निवडणूका लढल्या आहेत. येणारा उद्याचा काळ हा आपला असेल. तुम्ही खरी कमाल केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही यश मिळवलं आहे. लोक आपल्याकडे बघत आहेत. एकीकडे पैशाचा महापूर होता. या महापुराला निष्ठेची भिंत तोडता आली नाही त्यामुळे उद्याचा काळ हा आपला असणार आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंना कोकणात धक्का
सिंधुदुर्गात महायुतीची एकहाती सत्ता आली आहे. मागील 27 वर्षं नारायण राणे यांच्या विचाराचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसत असून, राणेंनी गड राखला आहे. तळकोकणात भाजपा कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सुरु आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आपला गड राखण्यात अपयशी ठरले आहेत. वैभव नाईक यांच्यासाठी ही आतित्वाची लढाई होती.
नितेश राणे यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, “कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत 100 टक्के सत्ता महायुतीची आहे. म्हणून उबाठा आणि महाविकास आघाडीला तोंडावर आपटणे काय असते? धूळ चारणे काय असते? हे बघायचे असेल तर सिंधुदुर्गाचे निकाल पाहायला पाहिजेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सबकुच देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला यश मिळाले”.
विरोधकांकडून कोकणातील निकाल नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यापुरता असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर ते म्हणाले, “मग, ते कोणत्या पक्षाचे आहेत? भाजप-शिवसेनेचे आहेत. त्यांच्याकडे कुठे 100 लोक आहेत? त्यांच्याकडे एकच उद्भव ठाकरे, राज ठाकरे, राहुल गांधी आहेत. लोकांचा विश्वास महाविकास आघाडीवरून उडालेला आहे. हे लोकसभेपासून जिल्हा परिषदपर्यंत वारंवार दिसतेय. पुढील 5वर्षांसाठी सिंधुदुर्गचा विकास करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत”.
कणकवली तालुका
१) वरवडे – सोनू सावंत (भाजप)
२) नांदगाव – हर्षदा वाळके (भाजप)
३) जाणवली – महेश्वरी चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी – संजना राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक – दिव्या पेडणेकर (भाजप)
६) नाटळ – सायली कृपाळ (भाजप)
देवगड तालुका
७) पडेल – अंकुश ठूकरूल (भाजप)
८) नाडण – गणेश राणे (भाजप)
९) बापर्डे – संजना लाड (भाजप)
१०) फणसगाव – समृद्धी चव्हाण (भाजप)
११) शिरगाव – शितल तावडे (भाजप)
१२) कोटकामते – ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी
१३) कोकिसरे – साधना नकाशे (भाजप)
वेंगुर्ले
१४) आसोली – संकेत धुरी (भाजप)
१५) म्हापण – विष्णू फणसेकर (भाजप)
मालवण
१६) आडवली मालडी – सीमा परुळेकर (भाजप)
१७) आचरा – दिपक सुर्वे (भाजप)
सावंतवाडी
१८) शेर्ले – महेश धुरी (भाजप)
१९) विलवडे – प्रशांत सुकी (भाजप)
२०) माडखोल – प्रथमेश सावंत (अपक्ष)
२१) शिरवंडे – दीपक चव्हाण (शिवसेना)
२२) आंबोली – मायकल डिसोझा (शिवसेना)
दोडामार्ग
२३) कोलझर – गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)
२४) राजेश जाधव (भाजप)
२५) खारेपाटण, कणकवली – गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना शिंदे गट)
२६) देवगड मुणगे – सदाशिव ओगले (भाजप)
२७) देवगड तळवडे – सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे गट)
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



