
Sandeep Deshpande on Uddhav Thackeray Shivsena: चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर झालाय. यावरून आता मविआमध्येच जुंपली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वार पलटवार सुरू झालेत. त्यातच मनसेनंही ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला आहे. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या पाठिंब्यावेळी टीका करणारेच आता चंद्रपुरात भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत आहेत. संजय राऊत यांना अंधारात ठेवले गेले की त्यांनीच डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, हे आता पाहावे लागेल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच नगरसेवकांना प्रत्येकी 1-1 कोटी मिळाले असा खळबळजनक दावाही केला आहे.
भाजपविरोधात रान उठवणा-या मनसेनं कल्याण डोंबिवलीत भाजपसोबत युती केल्यावरून मोठी टीका झाली होती. संजय राऊतांनी यावरून मनसेला धारेवर धरलं होतं. पण आता संजय राऊतांना मनसेनं कोंडीत पकडलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1-1 कोटी मिळाले असा खळबळजनक दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तर देशपांडेंनी पुरावे दिल्यास आम्ही सर्व पदाधिकारी राजीनामा देऊ, असं आव्हान चंद्रपुरातील ठाकरेंचे नेते संदीप गि-र्हे यांनी दिलं आहे.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या पाठिंब्यावेळी टीका करणारेच आता चंद्रपुरात भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत आहेत. संजय राऊत यांना अंधारात ठेवले गेले की त्यांनीच डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, हे आता पाहावे लागेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री.… pic.twitter.com/dgY2vs1fNG
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 12, 2026
यानंतर संदीप देशपांडे यांनी आज सकाळी एक्सवर पोस्ट केली असून पुरावा देणार असल्याचं म्हटलं आहे. “ज्या दिवशी जनतेला तुम्ही “पन्नास खोक्यांचे ” पुरावे द्याल त्या दिवशी शंभर टक्के चंद्रपूर मधल्या “एक खोक्याचा “पुरावा देणार म्हणजे देणार,” असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
ज्या दिवशी जनतेला तुम्ही “पन्नास खोक्यांचे ” पुरावे द्याल त्या दिवशी शंभर टक्के चंद्रपूर मधल्या “एक खोक्याचा “पुरावा देणार म्हणजे देणार.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 13, 2026
चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर झाला आहे. शिवसेना ठाकरे पक्षानं चंद्रपुरात भाजपला पाठिंबा दिला आहे. यावरून राज्यात नवं राजकारण पेटलं आहे. चंद्रपुरात काँग्रेसमध्ये दोन गट असून शेवटपर्यंत त्यांच्यात एकवाक्यता झाली नाही, असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे. धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातला वाद मिटलाच नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर उलथापालथ झाल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. भाजपला साथ देण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नव्हतीच असा पुनरुच्चारही राऊतांनी केला आहे.
चंद्रपुरात ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यावरून काँग्रेसनं आगपाखड केली होती .हर्षवर्धन सपकाळांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली होती. यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कल्याण-डोंबिवलीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिला होता, तर आता चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय. महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपविरोधात रान उठवलं होतं. मात्र कल्याण डोंबिवली आणि चंद्रपुरात मनसे आणि शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानं अनेकांना धक्का बसलाय, हे निश्चित.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



