digital products downloads

‘विलिनीकरणानंतर अजित पवारांकडे सोपवलं जाणार होतं नेतृत्व’, गौप्यस्फोटावर NCP कडून पहिली प्रतिक्रिया, ‘मान्य करुन…’

‘विलिनीकरणानंतर अजित पवारांकडे सोपवलं जाणार होतं नेतृत्व’, गौप्यस्फोटावर NCP कडून पहिली प्रतिक्रिया, ‘मान्य करुन…’

Ajit Pawar NCP on Shashikant Shinde Article: विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धूरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लेखातून केला आहे. शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांना समर्पीत करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्षीय लेखात हा दावा करण्यात आला आहे. दरम्यान यानंतर त्यांनी आता यापुढे आमच्या पक्षाकडून विलिनीकरणाचा विषय संपला असल्याचंही स्पष्ट केलं आहे. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्के सूरज चव्हाण यांनी आम्हाला त्यांच्या हेतूवर शंका असल्याचं म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

त्यांचा हेतू योग्य दिसत नाही – सूरज चव्हाण

“अजित पवारांचं नेतृत्व आधीही त्यांच्या पक्षातील सर्व नेत्यांना मान्य होतं. पण काही लोक ज्यांच्या इच्छा होत्या, त्यामुळे मतभेद निर्माण झाले होते. पण त्यांच्याही अनेकांना अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं. पण त्या विलिनीकरणासंदर्भात काय निर्णय झाला, काय ठरलं होतं, दादा आणि त्यांच्यात काय चर्चा झाली होती? यावर आता बोलण्यापेक्षा वर्तमान आणि भविष्यात काय करता येईल यावर चर्चा झाल्या पाहिजेत,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सांगितलं आहे. 

“सुनेत्रा पवार आता आमच्या पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांच्यासोबत जर चर्चा करायची असेल तर ते करु शकतात. पण ज्याप्रकारे ते चर्चेला समोर येत आहेत, त्यावरुन त्यांचा हेतू योग्य दिसत नाही. त्या हेतूवर आम्हाला शंका येते. कारण विलिनीकरणाच्या चर्चा माध्यमात होत नसतात,” असंही त्यांनी सांगितलं. 

 

“आता काही लोक सत्तेसाठी अजित पवारांचं नेतृत्व मान्य करत होते, तर काहीजण सत्ता नसतानाही मान्य करत होते. आज अजित पवार हयतीत नाहीत आणि पार्थिव विद्या प्रतिष्ठानात असताना विलिनीकरणाच्या चर्चा करत होते त्यांचा हेतू कुठेही शुद्ध वाटत नाही. फक्त सत्तेसाठी विलिनीकरणाचा हेतू दिसत आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे. 

“आमच्याकडून कधीही विलिनीकरणाच्या विषयावर चर्चा झाली नाही. जे काही चर्चा झाल्या, अजित पवारांच्या बैठका हे सगळे खुलासे त्यांच्याकडून होत होते. आमची प्राथमिकता अजित पवारांच्या कुटुंबाच्या, पक्षाच्या मागे उभे राहणं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर चर्चा व्हायची असेल तर ती वरिष्ठ पातळीवर होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

आमच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही – अमोल मिटकरी

अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “सुनील तटकरेंनी यावर स्षष्टीकरण दिलं आहे. विलिनीकरणाची चर्चा आमच्या पक्ष पातळीवर सध्या तरी नाही. 15 दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवारांवर अंत्यविधी झाल्यानंतर विलिनीकरणावर पहिली प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली होती. त्यानंतर हा विषय सुरु झाला. अंकुश काकडे यांनी 12 ताऱखेचा दावा केला होता. या त्या गटाने दिलेल्या माहिती आहेत. पण वरिष्ठ पातळीवरील बैठकीत किंवा आमच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही अद्याप अजित पवार जाण्याच्या धक्क्यातून सावरलेलो नाही. अमोल कोल्हे यांनीच ही चर्चा सुरु केली”.

“पवार कुटुंब हे राजकारण आणि कौटुंबिक बांधिलकी वेगळं ठेवतं. जय पवार यांच्या लग्नात युगेंद्र पवार, रोहित पवार होते. शरद पवार प्रकृतीच्या कारणास्तव परदेशात गेले नव्हते. पण त्याचे वेगळे अर्थ लावले गेले. सुप्रिया सुळेंनीही त्यांच्या मुलीचं लग्न अजित पवारांच्यासमोर ठरल्याचं सांगितलं. परिवार आणि राजकारण हे वेगळं आहे. राजकारणात वेगळे असले तरी कौटुंबिकपणे एकत्र आहेत. हा महाराष्ट्रासमोर वेगळा आदर्श आहे,” असंही त्यांनी सांगितलं. विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर निर्णय घेतील. त्या निर्णयाला आम्ही एकमताने पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp