digital products downloads

‘उचलली जीभ लावली दाढीला,’ परभणीवरुन संजय राऊतांची एकनाथ शिंदेवर टीका, ‘भाजपाचे 12 नगरसेवक मुस्लिम…’

‘उचलली जीभ लावली दाढीला,’ परभणीवरुन संजय राऊतांची एकनाथ शिंदेवर टीका, ‘भाजपाचे 12 नगरसेवक मुस्लिम…’

Shivsena Muslim Mayor in Parbhani: परभणी महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौरपदी विजयी झाले आहेत. दरम्यान शिवसेनेने मुस्लिम महापौर बसवल्याने महायुती त्यांच्यावर टीका करत असताना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी अभ्यास करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. देशाचे सरन्यायाधीस मुसलमान होतात. हायकोर्टात न्यायाधीश, राज्यपाल, राष्ट्रपती मुस्लिम होतात याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“एकनाथ शिंदेंना अभ्यास करायला सांगा. डोक्याला तेल लावा. परभणीत भाजपाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत. उचलली जीभ लावली दाढीला असं करु नका. इतर ठिकाणीही असंख्य मुस्लिम आहेत. या देशात मराठीभाषिक मुस्लिम घुसखोर नाही. वर्षानुवर्ष ते आमचे तालुका प्रमुख, पदाधिकारी आहेत. तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला. तुम्ही ज्या ताटात खाल्लं तिथे तंगडी वर करणार,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

 

“ते निष्ठावान आहेत पक्षाचे काम करत आहेत. जर त्यांना परभणीत महापौर केलं तर त्यांच्या पोटात दुखणारच. या देशाचे सरन्यायाधीस मुसलमान होतात. हायकोर्टात न्यायाधीश, राज्यपाल, राष्ट्रपती मुस्लिम होतात. भाजपाचा महापौर असता तर या 12 पैकीच असता. मुसलमान-हिंदू करण्याशिवाय यांच्याकडे काम नाही”, अशी टीकाही त्यांनी केली. 

शिवसेना आणि काँग्रेसची युती

परभणी पालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसला असून, काँग्रेसचा उपमहापौर विराजमान झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौरपदी विजयी झाले आहेत. तर काँग्रेसच्या गणेश देशमुखांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. 

शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर

शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर झाले असून, त्यांना 39 मतं मिळाली. यामधील शिवसेनेचे 25, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1 अशी एकूण 39 मतं मिळाली. भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली. काँग्रेसचे गणेश देशमुख यांचा उपमहापौरपदी विजय झाला आहे. गणेश देशमुख यांना 37 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाझीमा अब्दुल रहीम यांना 27 मतं मिळाली आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp