digital products downloads

विलीनीकरणाचा विषय सुनील तटकरेंंनी एका वाक्यात संपवला; शशिकांत शिंदे यांच्या मोठ्या गौप्यस्फोटावर बोलताना स्पष्ट म्हणाले…

विलीनीकरणाचा विषय सुनील तटकरेंंनी एका वाक्यात संपवला; शशिकांत शिंदे यांच्या मोठ्या गौप्यस्फोटावर बोलताना स्पष्ट म्हणाले…

 Ajit Pawar NCP on Shashikant Shinde Article: राष्ट्रवादी SPचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी  दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबात मोठा गौप्यस्फोट केला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारमात खळबळ माजली. एका साप्ताहिकातील लेखात त्यांनी खळबळजनक दावे केले.  दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडे दिलं जाणार होते. शरद पवारांसह सर्व नेत्यांचं याबाबत एकमत झालं होतं असा दावाही त्यांनी केला. विलीनीकरणाचा विषय सुनील तटकरेंंनी एका वाक्यात संपवला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरुन महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरुन दोन्ही गटात मोठे मतभेद पहायला मिळत आहेत. अशातच  शशिकांत शिंदे यांच्या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदेंना फटकारलं आहे.  शशिकांत शिंदेंचा लेख गैरलागू आहे.  शशिकांत शिंदेंना योग्य उत्तर देईन.  शशिकांत शिंदेंनी असं लिखाण करु नये  असही तटकरे म्हणाले. 

विलीनीकरणाबाबत सुनील तटकरेंंनी एका वाक्यात उत्तर

मी वारंवार सांगितले आहे. या संदर्भातील निर्णय जेव्हा प्रस्ताव मांडला जाईल तेव्हा जेव्हा चर्चा सुरू करून घेतला जाईल असे तटकरे यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणावर सुनेत्रा वहिनी आणि पक्षाचे नेते यावर चर्चा करतील.  पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत NCP पक्ष निर्णय घेईल. शशिकांत शिंदे यांच्या लेखातील काही वाक्य गैर आहेत.  शशिकांत शिंदे यांच्या लेखातील मजकुरावर माझा आक्षेप आहे. भाजपसोबत राहावे अशी दादांची वारंवार भूमिका होती. २०१४, २०१९ आणि आता देखील भाजपसोबत राहण्याचे त्यांचे मत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत राहावे यासाठी दादांनी वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेतली होती.

शशिकांत शिंदे यांच्या लेखामागचा हेतू काय माहिती नाही

शशिकांत शिंदे यांच्या लेखामागचा हेतू काय माहिती नाही.NCP चे मासिक दर महिन्याला प्रकाशित होत असते. आता 12 तारखेला हे मासिक येणे योगायोग आहे की काय बघावं लागेल. लेखाचे शीर्षक आहे भावपूर्ण निरोप अजित दादांना, याचा अर्थ दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा लिहिलेला हा लेख आहे.  भाजपसोबत गेले पाहिजे अशी दादांची स्पष्ट भूमिका होती. त्यांनी पक्षाच्या नेत्यांना वेळोवेळी सांगितले होते. शशिकांत शिंदे यांना बोलण्याचा लिहिण्याचा अधिकारी आहे. मी त्याबद्दल नाही बोलणार.

हिरामण खोसकर यांच्याशी मी जरूर बोलेल. 2019 मध्ये त्यांना दादांनी उमेदवारी दिली. ते चांगले आमदार आहेत. त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. त्यांच्यासोबत एकत्रित बसून चर्चा करू. मी हिरामण खोसकर यांचे मत जाणून घेईल. शशीकांत शिंदे यांचा इशारा कोणाकडे आहे ते त्यांना माहिती. ते साताऱ्याचे आहेत.  दादांचा आता मृत्य झाला आहे. ते बैठकीत काय बोलले होते याबद्दल आता बोलणे चुकीचे.. दादा असताना जी ताकद NCP ला मिळत होती. तीच ताकद पक्षाला मिळत राहील असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत दिले आहे. विलीनीकरण संदर्भात शरद पवार गटाकडून चर्चा सुरू होईल तेव्हा बघू.  शशिकांत शिंदे यांनी असे लिखाण करू नये. त्यांनी असे लिखाण सुरू ठेवले तर ncp चा प्रदेशाध्यक्ष म्हणून योग्य उत्तर देणार. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते. योग्य वेळेला योग्य बोलणे गरजेचे असते. पक्षाची भूमिका योग्य वेळेला स्पष्ट मांडत राहणार

सुनील तटकरेंनी नरेश आरोराबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं

खासदार सुनील तटकरेंनी नरेश आरोराबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.. प्रश्न विचारताच तटकरेंनी हात जोडले. अजित पवार नरेश अरोराचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार होते. तुमच्यात खडाजंगी झाली होती, असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. नेमकी काय चर्चा झाली होती? असा सवाल झी 24 तासनं विचारला होता. यावर बोलताना तटकरेंनी हात जोडला. अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची देखील मागणी आहे. देशाबाहेरील आणि देशांतर्गत संस्थांकडून याचा तपास केला जावा. या संदर्भातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर यावे. नरेश अरोरा यांचा कंत्राट रद्द करण्याबाबत ते काहीच बोलले नाहीत.  कधी बोलावे याचे मला राजकीय भान आहे. या विषयावर ज्यावेळेस बोलायचे असेल तेव्हा जरूर बोलेल अस देखील तटकरे म्हणाले. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp