
Amol Mitkari Letter For Ajit Pawar: आमदार अमोल मिटकरी यांचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खुपच जिव्हाळ्याचे नाते होते. व्हॅलेंटाइन निमित्ताने त्यांनी त्यांच्या ‘अजित दादांसाठी’ पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अजित पवार यांचे त्यांच्या जीवनातील महत्त्व , त्यांच्याबद्दलचा आदर, प्रेम व्यक्त केले आहे. तसेच त्यांच्या आयुष्यात अजित दादांनी त्यांच्यासाठी जे काही केले त्याबाबत आभार व्यक्त केले आहे.
तिर्थरूप
आदरणीय दादा,
नमस्कार!
आज ‘व्हॅलेंटाइन डे’! आपल्या प्रिय व्यक्तीप्रती भावना व्यक्त करण्याचा जागतिक प्रेम दिन. तुम्ही समोर असताना कदाचित हे प्रेम व्यक्त करण्याची हिंमत मी करू शकलो नसतो, पण आज तुमच्या अनुपस्थितीत या पत्ररूपी शब्दप्रपंचातून ती व्यक्त करत आहे.
दादा, आषाढी एकादशीची सपत्नीक विठ्ठल महापूजा आपणच करणार, हा विश्वास श्रीक्षेत्र पंढरपूर आणि मला प्रत्येक एकादशीला वाटत आला. जन्मापासून जेव्हा समज यायला लागली, तेव्हापासून विठ्ठल प्राणप्रिय वाटला. माझ्या वडिलांची मिराशी बनलेला हा विठ्ठल आमच्या घरात ३३ कोटी देवांना बाजूला सारून आमचे सर्वस्व बनला होता. तुमच्या आणि सौ. सुनेत्रा वहिनींच्या हस्ते, तुमच्याच कृपेने उभ्या राहिलेल्या माझ्या घरात विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचे स्वप्न होते. काही कारणास्तव आपण येऊ शकला नाहीत, तरी आपल्या परवानगीने वारकरी श्रेष्ठांच्या हस्ते मी सपत्नीक ती मूर्ती देवघरात बसवली. ७ एप्रिल २०२५ ते २८ जानेवारी २०२६ या काळात मी घरात नित्य पूजा, भजन आणि विठ्ठल नामाचा गजर केला. माझ्या घरात पंढरीचे दैवत नांदत होते आणि माझा संसार पुण्यरूप होऊन फळाला येत होता.
मात्र, २८ जानेवारीची दशमी आणि २९ जानेवारीच्या एकादशीने माझ्या कुटुंबावर असा घाला घातला की, आमचा विठ्ठल आम्हाला सोडून गेल्यासारखे झाले. पूर्वी या विठ्ठलाने माझ्या वडिलांना हिरावून नेले, तर आता राजकारणातील माझ्या ‘बाप’ माणसाला सोबत नेले. पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाची धुळधाण झाली.
“माझे बुडविले घर । लेकर बाळे दारोदार |
लावली काहार । तारातीर करोनी ।।”
दादा, आज कैलेंटाइन डे ! आपल्या प्रिय व्यक्तीप्रती प्रेमळ भावना व्यक्त करण्याचा जागतिक प्रेम दिवस! तुम्ही असतांना प्रेम व्यक्त करण्याची मी हिंमत करू शकलो नाही मात्र तुम्ही नसदांना आज या पत्ररूपी शब्दप्रयत्नातून ती व्यक्त करावी वाटतेय!
तुम्ही दिवंगत झालात याशब्दावर माझा तरी विश्वास नाही. हा माझा वेडेपणा असेल पण माझं मन हे मानायला तयार होणार नाही. तुम्हीच मला 2019 ला ऐकलं, पक्षात घेत जवाबदारी दिली, हवाई प्रवासात फिरविलं, आमदार केलं, घर उभारुन दिल, इज्जत
दिली राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विदेशात पाठवलं, वडिलांच दुःख विसरून कामाला लावलं, शिस्त लावली, कामात रमण्याचा पाठ दिला, सगळं सगळं दिलं.
अमोल मिटकरी हा अनेकांना अप्रिय वाटणारा, छोट्या समुहातील व्यक्ती तुम्हालाच प्रिय वाटला! वडिलांना आवडलो यापूर्वी मात्र त्यानंतर तुम्हाला ! पूर्वीही परिवाराने, समाजान, समाजान, नातेवाईकाने दूर लोटलं, परिवारात प्रेमाने बोलणारं, माझी वाट पाहणार फक्त ४-५ माणसे तेही माझ्यापेक्षा लहान, मी वाईट नसताना वाईट ठरवला गेलो पण दादा तुम्हीच मला समजून घेतलं. अनेक चुकतो, तुम्ही चुका दुरुस्त करुन पुढे जायला शिकवलं. वाढदिवस असला की पहिला फोन तुमचा, सुखादुःखात खंबीरपणे पाठीशी फक्त दादा तुम्हीच!
तुमच्या नावावर माझी प्रशासकीय ‘द्वादा गिरी चालायची. तुमच्या नावावर जहागिरीदारी करत आलो. मला आमदार केल्याचा किस्सा व शपथ होईपर्यंतच्या आश्चर्यकारक घटना व परिस्थिती आपल्याला व मलाच माहित होती!
माझ्या गावाला मला आपल्यामुळे उजेडात आणला आहे. आपल्यामुद गाव, परिवार, निसर्ग शहर, जनता, पशुपक्षी, खेळ आदींवर प्रेम करायला शिकलो. शिवशाहू, फुले, आंबेडकरांवर तुमची श्रद्धा व विश्वास हा तुमच्यातील व माझ्यातील समान दुवा होता!
‘स्वराज्यरक्षक’ या मुद्द्यावरही आपली भूमिका अवघ्या महाराष्ट्राने बघितली. “कुण्याही जिवाचा न घडो मत्सर” हा पसायदान स्वभाव तुम्ही अंगिकारला. हेच तुमचं वेगळेपण!
भिमा कोरेगावला दरवर्षी न चुकता अभिवादन करित स्वाभिमानाने जयभिम म्हणणारा तो करारी आवाज आज कानावर पडणार नाही. याची सल कायम टोचत राहणार!
शिववेषात आलेल्या व्यक्तीला आपण घातलेला मुजरा, मुस्लीम बांधवांबद्दल असलेले आपले प्रेम आणि जिव्हाळा… आज हे सर्व हरवले आहे.
माझ्याजवळ खुप काही आठवणी सांगण्यासारख्या असुनही काहीच सांगण्यासारखं नाही!
व्हॅलेंटाइन डे ला तुम्हाला जनतेने दिलेला आवाज
लव्ह यु दादा…..दादा आय लव्ह यु….!
आज खुप मिस करतोय दादा….
भविष्याने माझ्या ताटात काय वाढून ठेवलय ले सांगता येणार नाही. जीवनाचा शेवटचा दिवस गोड व्हावा हे प्रत्येकाला वाटतं, मात्र तुमच्या नशिबी ते ही आलं नाही. सुखाच्या क्षणापेक्षा निंदा नालस्ती व हेटाळणीचं देवाने दिली.
आज एकदशी पण आहे, तुमच्या मुळे मी विठ्ठलाच्या अधिक प्रेमात पडलो मात्र त्याने याच दिवशी तुम्हालाही छळलं…
तो विठ्ठल आता सुटलाय….. त्याच्याशी आयुष्यभर भांडण कायम राहील!
कळावे
आपला
अमोल मिटकरी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



