digital products downloads

…म्हणून अपघाताबाबतचा संशय अधिक बळावला; रोहित पवारांची आणखी एक सूचक पोस्ट

…म्हणून अपघाताबाबतचा संशय अधिक बळावला; रोहित पवारांची आणखी एक सूचक पोस्ट

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. पवार कुटुंबियांसाठी हा एक मोठा आघात होता अशा या अपघातानंतर अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात आले आणि पवार कुटुंबातील सदस्य, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही महत्त्वाचे प्रश्न अधोरेखित करत या प्रश्नाना दुजोरा दिला. आपण कोणावरव प्रश्न उपस्थित करत नसून आपल्या शंकांचं निरसन होण्यासाठी हे प्रश्न उपस्थित करत आहोत असं म्हणत दादांना न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेवर रोहित पवार ठाम असल्याचं पाहायला मिळालं. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर लगेचच काही दिवसांनी अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली. विमान दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान एअर इंडियाचं विमान हेतूपूर्वक पाडण्यात आलं असा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढला आणि एकच खळबळ माजली. अहमदाबाद विमान दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली नव्हती तर जाणूनबुजून केलेल्या कृत्याचा परिणाम होती, असं इटालियन दैनिक Corriere della Sera  यांनी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील झालेल्या चर्चेच्या आधारे सूत्रांच्या हवाल्याने दिली मात्र, डीजीसीएने अद्याप याप्रकरणी कोणताही अधिकृत अहवाल दिलेला नाही. याचसंदर्भातील चर्चांचं वादळ उठलेलं असतानाच पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमान अपघातावरून काही संशय बळावल्याचं सूचक विधान रोहित पवारांनी केलं. 

पायलटवर कोणाचा दबाव होता का? 

सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहित पवारांनी लिहिलं, ‘अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे.’

सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?

दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?’

 

VSR कंपनीची विमानसेवा देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना दिली जात असताना त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत या कंपनीच्या देशातील सेवेवरच बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp