digital products downloads

पारा 35 अंशांवर! मे महिन्याचा इशारा फेब्रुवारीतच लागू; उकाडा आणखी वाढणार, मुंबई-कोकणासह विदर्भाची होरपळ

पारा 35 अंशांवर! मे महिन्याचा इशारा फेब्रुवारीतच लागू; उकाडा आणखी वाढणार, मुंबई-कोकणासह विदर्भाची होरपळ

Maharashtra Weather News :  वाऱ्यानं दिशा बदलली आणि महाराष्ट्रातील थंडीनं पाठ फिरवली. अशीच काहीशी स्थिती राज्यात पाहायला मिळत असून, देशभरातही आता धीम्या गतीनं थंडी काढता पाय घेताना दिसत आहे. तर, दक्षिण भारतात किनारपट्टी भागांमध्ये तापमानात होणाऱ्या चढ- उतारांचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार येत्या काळात राज्यातील तापमानवाढ कायम राहणार असून प्रामुख्यानं कोकणासह मुंबईलासुद्धा उष्ण आणि दमट हवामानाचा तडाखा बसणार आहे. ज्यामुळं उकाड्याच्या धर्तीवर इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

उकाडा वाढता वाढे….

महाराष्ट्राचा पारा सध्या 35 अंश सेल्सिअसवर पोहोचला असून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये उष्मा अधिक तीव्र जाणलवू लागला आहे. घाटमाथ्यावरील हिरवळ आता दिसेनाशी होत असून, मे महिन्यातील रखरखात फेब्रुवारीपासूनच पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्येसुद्धा उकाडा वाढत जाणार असून पुढील 24 तासांमध्येतरी या उष्णतेपासून सुटका नसल्यानं आठवडी सुट्टीचे बेतसुद्धा विचारपूर्वक आखलेला बरा, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. 

कोकणात वाढतोय उकाडा… 

कोकण आणि विदर्भातील अनेक भागात शुक्रवारीसुद्धा कमाल तापमान वाढलं होतं. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण पट्ट्यासह विदर्भातील काही भागात कमाल तापमान अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्यानं कोकण पट्ट्यातील कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसनं वाढ होईल आणि त्यांनतर तापमानाच किंचित घट होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पारा उष्णतेच्याच दिशेनं सरकत असल्यामुळं उन्हाळ्याची राज्यात खऱ्या अर्थानं सुरूवात झाली असून आता ही अवस्था, तर ऐन मे महिन्यात काय अवस्था असेल या विचारानं अनेकांना धडकीच भरत आहे. 

आयएमडीनं देशभरातील हवामानाविषयी काय म्हटलं? 

केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, झारखंड, ओडिशा, राजस्थान आणि महाराष्ट्राचा किंचित भाग अद्यापही गार वाऱ्यांच्या प्रभावाखाली असल्यानं पहाटे आणि रात्री उशीरा गारठा जाणवेल. तर, याउटल स्थिती दक्षिणेकडे केरळ, गोवा आणि कोकण किनरापट्टीवर दिसून येईल. जिथं उष्ण वारे अडचणी वाढवतील असा अंदाज आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp