digital products downloads

अजित पवारांच्या शैलीत सुनेत्रा पवार मैदानात: जनता दरबारातून थेट संदेश; माळेगाव साखर कारखान्यावर देखील नवे समीकरण? – Mumbai News

अजित पवारांच्या शैलीत सुनेत्रा पवार मैदानात:  जनता दरबारातून थेट संदेश; माळेगाव साखर कारखान्यावर देखील नवे समीकरण? – Mumbai News


बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाला. सहयोग या निवासस्थानी झालेल्या या उपक्रमात नागरिकांनी विविध प्रश्न, तक्रारी आणि मागण्या थेट त्यांच्या समोर मांडल्या. अजित पवार यांच्या प्रमाणेच निवेदने स्वी

.

या जनता दरबारात बारामती आणि आसपासच्या भागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पाणीपुरवठा, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य, स्थानिक पायाभूत सुविधा अशा अनेक विषयांवर तक्रारी मांडण्यात आल्या. काहींनी वैयक्तिक अडचणी मांडल्या, तर काहींनी सामूहिक मागण्या केल्या. सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक अर्ज स्वीकारत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे संकेत दिले. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

जनतेशी थेट संवाद साधण्याची ही पद्धत बारामतीत नवीन नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळातही अशाच प्रकारे नागरिकांच्या तक्रारी ऐकून तत्काळ निर्णय घेण्याची पद्धत पाहायला मिळाली होती. त्याच धर्तीवर सुनेत्रा पवार यांनीही लोकांशी संवाद साधला. नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर प्रशासनाशी समन्वय साधून लवकर निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाबाबतही चर्चा

दरम्यान, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाबाबतही चर्चांना उधाण आले आहे. या कारखान्याच्या चेअरमनपदी यापूर्वी अजित पवार कार्यरत होते. ते ब वर्ग गटातून निवडून आले होते. मात्र त्यांच्या जाण्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर सुनेत्रा पवार या ब वर्ग गटातून उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातील एक महत्त्वाचा उद्योग आहे. शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाशी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी या कारखान्याचा थेट संबंध आहे. त्यामुळे चेअरमनपदावर कोण विराजमान होणार, याला विशेष महत्त्व आहे. जर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी दाखल केली, तर त्याला राजकीयदृष्ट्याही मोठे महत्त्व प्राप्त होईल, अशी चर्चा रंगली आहे.

जनतेशी थेट संपर्क आणि संघटनात्मक पातळीवरील हालचाली

जनता दरबाराच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी एकीकडे जनतेशी संवाद साधला, तर दुसरीकडे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चांनाही चालना मिळाली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असा त्यांचा स्पष्ट संदेश होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासन अधिक सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, बारामतीत झालेला हा जनता दरबार केवळ तक्रारी ऐकण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यातून पुढील राजकीय घडामोडींची चाहूलही लागली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. जनतेशी थेट संपर्क आणि संघटनात्मक पातळीवरील हालचाली यामुळे बारामतीच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp