digital products downloads

प्रेम, विश्वासघात अन् हत्येचा कट… मृतदेहासोबत 191 तासांचा प्रवास, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण

प्रेम, विश्वासघात अन् हत्येचा कट… मृतदेहासोबत 191 तासांचा प्रवास, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण

Crime News: महारष्ट्रातील कळंबोली परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला साधा वाद वाटणाऱ्या घटनेचं थेट खुनात रुपांतर झालं. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन टाकल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेला कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अल्पावधीत तपास करत संपूर्ण कट उघड केला आणि संबंधितांना अटक केली. मात्र ही घटना डोकं चक्रावणारी आहे. 

Add Zee News as a Preferred Source

विहिरीत सापडला मृतदेह
6 February रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुखेड गावातील शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ओळख पटवणे कठीण होते. चौकशीनंतर हा मृतदेह कळंबोली परिसरातील सोमनाथ बोबडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह जाळून ओळख मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. लोणंद पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला तपासाचा धागा
घटनास्थळाजवळील कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. काही वाहनांची संशयास्पद हालचाल आढळल्याने तपासाची दिशा बदलली. पोलिस पुण्यातील एका कारपर्यंत पोहोचले. या माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले. अवघ्या 3 दिवसांत पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा केला.

बंडू भिसेचा संशय आणि खूनाचा कट
या गुन्ह्याचा मुख्य आरोपी बंडू भिसे हा रबाळे MIDC पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदार असल्याचे समोर आले. सोमनाथ बोबडे आणि बंडू भिसे यांच्यात मैत्री होती. मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी संबंध असल्याचा संशय भिसेच्या मनात निर्माण झाला. याच कारणावरून त्याने सूड उगवण्याचा निर्णय घेतला. 5 February रोजी विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे यांना बोलावून सोमनाथ बोबडे यांना भेटीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर तोंड दाबून त्यांचा खून करण्यात आला.

191 किलोमीटरचा मृतदेह प्रवास
गुन्ह्यानंतर आरोपींनी मृतदेह कारमध्ये ठेवून कळंबोलीहून सातारा जिल्ह्यात नेला. जवळपास 191 किलोमीटरचा प्रवास करून सुखेड गावात मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आणि नंतर विहिरीत फेकून दिला. पुरावे नष्ट व्हावेत यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेतली होती.

हे ही वाचा: धक्कादायक! दोन वर्षांनंतर मृत पत्निच्या फोनवरुन आला OTP; फोन ट्रॅक करताच… डोकं चक्रावणारा घटनाक्रम

पोलिसांची कारवाई आणि अटक
सहआरोपींना चौकशीत विश्वासात घेतल्यावर संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट झाला. पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिवाजी जायपात्रे आणि उपनिरीक्षक रोहित हेगडे यांच्या पथकाने सर्व आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp