
Rahul Narvekar Video : शिवसेना UBT चे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जमिनीच्या मोजणी प्रकरणावरून राहुल नार्वेकर यांचा स्थानिक लोकांसोबत वाद झाल्याचं दिसतंय. एवढंच नाही तर या व्हिडीओमध्ये स्थानिक लोक एका व्यक्तीला मारहाण करताना सुद्धा दिसतायत. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा तिथे उपस्थित होते. मात्र जेव्हा वाद चिघळला तेव्हा नार्वेकरांनी तेथून पळ काढला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शनिवारी दुपारी शेअर केला. हा व्हिडीओ अलिबागमधील असल्याची प्राथमिक माहिती असून शेतजमिनीच्या मोजणीवरून हा वाद झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले की, ‘विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?’ या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा टॅग केलंय.
ब्रेकिंग:
विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?
राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!
तुम्ही सांगताय की मी सांगू?
Dev_Fadnavis
rahulnarwekar
PMOIndia pic.twitter.com/r5YqC9j2XiSanjay Raut (rautsanjay61) February 14, 2026
हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा केली पोस्ट :
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा व्हिडीओ शेअर केला. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला’.
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते.
स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला. pic.twitter.com/dwkLfStirh
Harshwardhan Sapkal (INCHarshsapkal) February 14, 2026
या सर्व प्रकरणावर आता राहुल नार्वेकर किंवा भाजप काय भूमिका मांडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



