digital products downloads

शिक्षकांनतर पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे: आमदार लवटे यांचे प्रतिपादन जिल्हा परिषद साईनगर शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात‎ – Amravati News

शिक्षकांनतर पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे:  आमदार लवटे यांचे प्रतिपादन जिल्हा परिषद साईनगर शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात‎ – Amravati News



काही कुटूंबात आईवडील दोघेही नोकरीनिमीत्त घराबाहेर पडत असल्याने मुलांकडे हवे तसे लक्ष देऊ शकत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या प्रगतीवर होतो. उज्वल भविष्यासाठी शिक्षकानंतर पालाकांनी घरी मुलांकडे लक्ष देणे खुप गरजेचे ठरते. असे प्रतिपादन आमदार गजानन लवटे यांनी केले. दर्यापूर पंचायत समिती अर्तंगत येणाऱ्या पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा साईनगर येथे आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथींमध्ये नगरपरिषद नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे, बांधकाम सभापती प्रविणा गावंडे, नगरसेविका सुनीता चव्हाण, सरपंच विजय जामणीक, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, गट समन्वयक सुनील स्वर्गीय, दर्यापूर केंद्रप्रमुख डी.आर. जामणीक, थीलोरी केंद्रप्रमुख संजय बोबडे, प्रभारी मुख्याध्यापिका प्रविणा कोल्हे, माजी मुख्याध्यापिका प्रतीभा पवीत्रकार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्चना भडांगे, महेंद्र दिपटे, अंकुश कावडकर, दिपक बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला पाहुण्यांचे स्वागत चिमुकल्यांनी स्वागत गित सादर करुन केले. त्यानंतर आ. गजानन लवटे व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली, विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण प्रकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मीळावा. या दुष्टीकोणातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी लेझीम, टीपरी नूत्यं, गायन, देशभक्ती, पारंपारिक आणि आधुनीक गीतांवर नृत्य व एकांकिका सादर करीत उपस्थीतांचे लंक्ष वेधले. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी मुख्याध्यापिका प्रतीभा पवीत्रकार यांनी प्राथमिक शालेय जीवनातूनच बालकांचे कूतहूल जागूत करुन त्यांच्या कल्पना शक्तीचा विकास होणे गरजेचे आहे. असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका प्रवीणा कोल्हे यांनी शाळेच्या संपुर्ण प्रगतीचा आढावा उपस्थीतांसमोर मांडला. संचालन शिक्षीका वंदना घुरडे, तर आभार शिक्षीका जया टाले यांनी मानले. कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, शिक्षक, पालकवर्ग व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या जिल्हा परिषद शाळेला विशेष महत्व जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळा एकीकडे बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच जिल्हा परिषद शाळा साईनगर मात्र त्याला अपवाद आहे. येथे दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मात्र प्रवेश फुल्ल झाल्यानंतर प्रवेश मिळत नाही हे वास्तव चित्र आहे. प्रवेशासाठी साईनगर जि.प. शाळेत गर्दी का असा प्रश्न नागरिकांना पडतो त्याचे कारण शिक्षकांची मेहनत व शालेय शिस्त होय.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp