digital products downloads

‘आधी त्या बाईची कानफटात कुणावर पडली?’, संजय राऊतांचा अलिबाग जमीन वादावरुन हल्लाबोल! ‘तर राहुल नार्वेकरांना…’

‘आधी त्या बाईची कानफटात कुणावर पडली?’, संजय राऊतांचा अलिबाग जमीन वादावरुन हल्लाबोल! ‘तर राहुल नार्वेकरांना…’

Sanjay Raut On Rahul Narvekar: निवडणुका आल्या की हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान करायचे हा भाजपचा खेळ आहे. त्यामुळे आम्ही हा सामना पहातच नाही. पाकिस्तानवर बहिष्कार, बांगलादेशीना हुसकायचं, मात्र जेव्हा पैशांचा विषय येतो, तेव्हा जय शाह यांना परवानगी दिली जाते. पाकिस्तानात टिपू सुलतानला नायक मानले जाते, मग त्यांच्याशी का सामना खेळता? असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी उपस्थित केलाय. 

Add Zee News as a Preferred Source

फडणवीस यांच्यातली आणि भाजपची उर्मी भरून आलीय. त्यांनी धिक्कार करायला हवा होता, ते ढोंगी लोक आहेत, ते अस करणार नाही. भारत पाकिस्तानवर स्वात मोठा जुगार खेळला जातो. मागच्यावेळी 25 हजार कोटी पाकिस्तानला गेले, यंदा जास्त जातील आणि हेच पैसे पुलवामा सारखे हल्ले करायला वापरले जातील. त्यांनी धिक्कार करावा ना? टिपू सुलतानला ते नायक मानतात, फोटो उतरवणे हे किरकोळ असल्याचे राऊत म्हणाले. 

संजय राऊतांनी यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर वक्तव्य केलंय. सपकाळ आणि काँग्रेसचे आम्ही बघू काय ते, आधी विषय कोणी घेतला? टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही. कोणीही काही बोलू द्या. मुंबईत भाजपने नाव दिलेत, मानखुर्द ला एका बगीचाला टिपू सुलतानचे नाव द्यायचा प्रयत्न झाला. टिपू सुलतानला मानणारे सर्व भाजपमध्ये आहेत, असेही ते म्हणाले. 

संजय राऊत यांनी भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केलीय. अलिबागला दीक्षा शाह यांची जमीन किती हे नार्वेकर यांना विचारा. गावकऱ्यांवर नंतर काय दबाव आणला असेल? मीही त्याच गावचा आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.आणखी जर त्यातलं काही काढलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, असे राऊत म्हणाले. क्वालिटी कंट्रोल इंडियाचे प्रमुख दीक्षा शाह जे गुजरातचे आहेत. त्यांनी अलिबागामध्ये प्रचंड जमीन घेतलीय. आणि तिथं दलाली कोणी केली हे सर्वांना माहितीय. अमित शहा आणि जय शाह यांचे दीक्षा शाह हे जवळचे आहेत. 
अगोदरचा व्हिडिओ कट झाला आहे. आधी त्या बाईची कानफटात कुणावर पडली. त्यानंतर पळापळ झाल्याचे राऊत म्हणाले.

अख्खी मुंबई खोदून ठेवलीय. हे सगळे कंत्राटदार बाहेरचे आहेत. यांना मुंबईचे काही माहित नाही. काल युपीतील सरपंच गेले. ते त्यांच्याच भाजपचे आहेत. ते रामभक्त होते. रामभक्ताला चिरडून मारले यांनी, अशी टीका राऊतांनी केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp